दशकातील बहुप्रतिक्षित ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाचं प्रमोशन जोरात सुरूयं, पण मौनी रॉय चित्रपटाचं फारसं प्रमोशन करत नसल्याचं प्रेक्षकांच्या लक्षात आलं. तिच्या लूकने सोशल मीडियावर चाहत्यांमध्ये सर्वाधिक उत्साह निर्माण केलायं. या चित्रपटात अभिनेत्री मौनी रॉय महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणारे. सुत्रांच्या माहितीनुसार, “निर्मात्यांना मुख्य विरोधी आणि ती काय प्रतिनिधित्व करते याबद्दल प्रेक्षकांना संशयात ठेवायचयं. त्यांचा असा विश्वास आहे की, मौनी रॉय हे एक अद्भुत शस्त्र आहे म्हणून कथेचा अनुभव घेण्यासाठी गुप्त ठेवायचयं.
अगदी अलीकडच्या स्पायडरमॅन मल्टीव्हर्ससह अनेक पाश्चात्य चित्रपटांनी, कथेच्या आश्चर्याची आणि रहस्याची गुरुकिल्ली असलेली खरोखर महत्त्वाची पात्रे समोर आणण्याचं हेच तंत्र वापरलयं. ‘ब्रह्मास्त्र’चे निर्माते देखील तिच्या व्यक्तिरेखेबद्दल माहिती देण्यासाठी आणि रहस्य जिवंत ठेवण्यासाठी प्रयत्न करतायेत. ब्रह्मास्त्र ही चित्रपट मालिका 9 सप्टेंबर 2022 रोजी रिलीज होणारे.