Aishwarya Rai's iconic Devdas saree created overnight says designer Neeta Lulla
भव्य दिव्य सेट्स आणि हटके कथानकांसाठी दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांची ओळख आहे. अनेक चित्रपटांच्या माध्यमातून प्रसिद्धीझोतात राहिलेल्या दिग्दर्शकांच्या या चित्रपटाची आजही प्रेक्षकांमध्ये जोरदार चर्चा आहे. ऐश्वर्या राय बच्चनच्या ‘देवदास’ चित्रपटाचे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी दिग्दर्शन केले होते. हा चित्रपट २००२ मधील सर्वाधिक सुपरहिट चित्रपटांपैकी एक ठरला. या चित्रपटाच्या एका सीनची आजही प्रेक्षकांमध्ये जोरदार चर्चा होते.
त्या एका सीनची आजही प्रेक्षकांमध्ये कमालीची चर्चा होते. तो सीन म्हणजे ‘देवदास’मध्ये चित्रपटाच्या शेवटी ऐश्वर्या पांढऱ्या रंगाच्या साडीमध्ये देवदासला (शाहरुख खान) शेवटचं पाहण्यासाठी धावत जात असते. या सीनचे अनेक व्हिडिओज आपण सोशल मीडियावर पाहिले असतील. या सीनसंबंधितच चित्रपटाची सुप्रसिद्ध कॉस्च्युम डिझायनर नीता लुल्ला हिने या सीनबद्दल आणि यामध्ये ऐश्वर्याने परिधान केलेल्या पाढऱ्या रंगाच्या साडीबद्दल एक किस्सा सांगितला आहे. सुप्रसिद्ध डिझायनर न्यूज १८ ला मुलाखत दिली.
‘सैराट’मधल्या सल्ल्याची गर्लफ्रेंड कोण? लवकरच बांधणार लग्नगाठ; फोटो व्हायरल!
‘न्यूज १८’ला दिलेल्या मुलाखतीत ‘देवदास’ चित्रपटाची सुप्रसिद्ध कॉस्च्युम डिझायनर नीता लुल्ला हिने त्या चित्रपटाच्या सीनबद्दल सांगितले की, “माझ्याकडे ‘देवदास’चित्रपटातील ऐश्वर्याची ती पांढरी साडी डिझाईन करण्यासाठी फक्त एका रात्रीचीच मुदत होती. चित्रपटामध्ये ऐश्वर्याच्या असलेल्या सर्व साड्या १२ ते १५ मीटर पर्यंत लांब होत्या. मला ऐश्वर्याच्या त्या फायनल सीनसाठी दोन ते तीन साड्या कापून तिच्यासाठी फायनल लूक करावा लागला होता. दिग्दर्शकांना दुर्गा पुजेला वापरली जाते तशी कॉटनची साडी हवी होती. आमच्याकडे तशी साडी होती आणि आम्ही पूर्ण तयारीही केली.”
‘बॉर्डर २’च्या शुटिंगला पुण्यात सुरुवात, निर्मात्यांनी शेअर केला सेटवरील फोटो
नीता पुढे म्हणाली, “संजय भन्साली यांनी ऐश्वर्याच्या साडीच्या पदराला शेवटी आग लागते, अशी कल्पना असल्याचे सांगितले होते. त्यासाठी त्यांना ती साडी छोटी वाटतेय असं म्हणाले. ते ऐकल्यानंतर मी लगेचच माझ्या संपूर्ण टीमसह कामाला लागले. रात्री ११ वाजता एका दुकानात जाऊन साडीसाठी लागणारं कापड खरेदी केलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ८ वाजेपर्यंत आम्ही ती साडी पूर्णपणे तयार केली होती.” संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘देवदास’ चित्रपट २००२ साली बॉक्स ऑफिसवर रिलीज झाला होता. हिट चित्रपटांच्या यादीमध्ये चित्रपटाची गणना केली जाते.
चित्रपटामध्ये, शाहरुख खानने देवदास मुखर्जीची प्रमुख भूमिका साकारली होती. तर, ऐश्वर्या रायने त्याची पत्नी पारोची भूमिका साकारली होती, तर माधुरीने चंद्रमुखीची भूमिका साकारली होती. हा चित्रपट २००२ साली प्रचंड गाजला होता. या चित्रपटाला पाच राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले होते. त्यातीलच एक पुरस्कार हा चित्रपटातील वेशभूषेसाठी देण्यात आला होता.