Thoda Tuza Thoda Maza Completes One Year Shivani Surve Shared Emotional Post Thanks Viewers
स्टार प्रवाहवरील अनेक मालिका टीआरपीच्या यादीमध्ये आपल्याला अव्वल स्थानावर आलेल्या पाहायला मिळतात. त्या मालिकांना प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद देखील मिळतो. त्यातीलच एक मालिका म्हणजेच, अभिनेत्री शिवानी सुर्वेची आणि अभिनेता समीर परांजपेची ‘थोडं तुझं आणि माझं’ ही मालिका… या मालिकेला १७ जूनला अर्थात आज १ वर्षे पूर्ण झालं आहे. मालिकेच्या वर्षपुर्तीनिमित्त अभिनेत्री शिवानी सुर्वे हिने खास इन्स्टाग्राम पोस्ट शेअर केलेली आहे.
‘सैराट’मधल्या सल्ल्याची गर्लफ्रेंड कोण? लवकरच बांधणार लग्नगाठ; फोटो व्हायरल!
‘थोडं तुझं थोडं माझं’ मालिकेमध्ये मानसी-तेजसची जोडीने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. मालिकेला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने मानसी ही मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री शिवानी सुर्वे हिने खास पोस्ट शेअर केली आहे. तिने या निमित्ताने प्रेक्षकांचे आभार मानले. स्टार प्रवाह वाहिनीने दाखवलेल्या विश्वासाबद्दल अभिनेत्रीने पोस्टच्या माध्यमातून कृतज्ञता व्यक्त केली. शिवाय, अभिनेत्रीने मालिकेतील सहकलाकार आणि पडद्यामागील टीमचेही कौतुक केले. सोबतच प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले, त्यामुळेच हे यश मिळाल्याचे मत अभिनेत्रीने व्यक्त केले.
‘बॉर्डर २’च्या शुटिंगला पुण्यात सुरुवात, निर्मात्यांनी शेअर केला सेटवरील फोटो
मालिकेच्या वर्षपूर्तीनिमित्त अभिनेत्री शिवानी सुर्वेने एक खास पोस्ट शेअर केली आहे. शिवानीने इन्स्टाग्रामवर मालिकेचं पोस्टर शेअर करत असं म्हटलंय की, “१७ जून. ‘थोडं तुझं थोडं माझं’ मालिकेची वर्षपूर्ती. हळूहळू, आमच्या मालिकेचं एक वर्ष पूर्ण झालं. सर्वप्रथम, स्टार प्रवाह वाहिनीने मानसीसह माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे. २०१२ पासून आपला एकत्र प्रवास सुरू झाला आहे आणि स्टार प्रवाहबरोबर आणखी एका सुंदर मालिकेचा भाग झाल्याबद्दल मी त्यांची आभारी आहे. माझ्यावर नेहमी विश्वास ठेवल्याबद्दल धन्यवाद.”
माझ्या मालिकेतील सहकलाकार किती वेडे, प्रतिभावान आणि अद्भुत आहेत. खूप भावनिक सीन शूट करण्यापासून ते टेकदरम्यान मोठ्याने हसण्यापर्यंत… अचानक घेतलेल्या कॉफ ब्रेकपासून ते स्नॅक्सवर ताव मारताना गप्पा मारण्यापर्यंत… आम्ही केवळ सीरियलच्या एपिसोडचं शूटिंग केलं नाही, तर आयुष्यभर आठवणीही तयार केल्या, ज्या मी आयुष्यभर जपून ठेवेन.. त्याचबरोबर आमच्या सर्व प्रेमळ प्रेक्षकांचेसुद्धा मनापासून आभार. या मालिकेवर इतका विश्वास आणि प्रेम दाखवल्याबद्दल तसंच मालिकेच्या प्रत्येक टप्प्यावर आमच्याबरोबर राहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.”
पोस्टच्या शेवटच्या भागात शिवानीने लिहिलंय की, “आमच्यावर प्रेम केले, आमच्या शोवर विश्वास ठेवला आणि प्रत्येक पावलावर साथ दिली, त्याबद्दल तुमचे मनःपूर्वक आभार. तुम्हा प्रेक्षकांचं प्रेम हेच आमचं उत्तम काम करण्याचं कारण आहे. यापुढेही ‘थोडं तुझं थोडं माझं’ या मालिकेवर असंच प्रेम करत राहा.” दरम्यान, शिवानीच्या या पोस्टला चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला आहे. ‘थोडं तुझं थोडं माझं’ मालिकेबद्दल सांगायचे झाल्यास, मालिकेत मुख्य भूमिकेत अभिनेत्री शिवानीसह समीर परांजपे, मानसी कुलकर्णी, ओमप्रकाश शिंदे, सोनल पवार, ऋग्वेद फडके, प्रणव प्रभाकर हे कलाकार आहेत.