Alia Bhatt Net Worth
बॉलिवूडमधील सध्याची आघाडीची अभिनेत्री म्हणून आलिया भट्टकडे कायम पाहिले जाते. मुळची भारतीय असलेल्या आलिया भट्टने ब्रिटिश नागरिकत्व स्वीकारले आहे. आलिया कायमच चाहत्यांमध्ये, व्यावसायिक तसेच वैयक्तिक अशा दोन्हीही लाईफमुळे चर्चेत असते. आज आलियाचा ३२ वा वाढदिवस आहे. आलियाचा १५ मार्च १९९३ रोजी जन्म झाला आहे. कायमच आपल्या अभिनयामुळे आणि सौंदर्यामुळे चर्चेत राहणाऱ्या आलियाच्या नेटवर्थबद्दल जाणून घेऊया…
३२ वर्षीय आलिया तब्बल ५५० कोटींची मालकीण आहे. लहान वयातच तिने बिझनेसमध्ये आणि आपल्या फिल्मी करियरमध्ये मोठे यश मिळवले आहे. आलिया भट्टचे स्वतःच्या मालकीचे प्रॉडक्शन हाऊस आहे, तिने वेगवेगळ्या बिझनेसमध्ये पैसे गुंतवले आहे. म्हणूनच ती चित्रपटांच्या कमाईतून नव्हे तर बिझनेसच्या माध्यमातून ती पैसे कमावते. बिझनेसच्या माध्यमातून कमावलेल्या पैशातून अभिनेत्रीने एवढी मोठी संपत्ती कमावली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आलिया भट्टने तिची संपत्ती ६ यशस्वी ब्रँडमध्ये पैसे गुंतवले आहे. स्वतःच्या कंपनीव्यतिरिक्त, तिने अनेक कंपन्यांमध्ये शेअर्स देखील खरेदी केले आहेत.
आलिया भट्टने २०२० मध्ये इंटर्नल सनशाइन प्रॉडक्शनची स्थापना केली, ज्यामध्ये तिने ‘डार्लिंग’ आणि ‘जिग्रा’ सारख्या चित्रपटाची निर्मिती केली. केवळ प्रॉडक्शन हाऊसच नाही तर आलिया भट्टने फॅशन इंडस्ट्रीमध्येही प्रवेश केला आहे. आलिया भट्टची ‘इड अ मम्मा’ नावाची कंपनी २ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांसाठी पर्यावरणपूरक कपडे बनवते. या कंपनीने काही वर्षातच कोट्यवधींची कमाई कमाई केली. याशिवाय, आलिया भट्टने ‘नायका’ नावाच्या ई-कॉमर्स वेबसाइटने गुंतवणूक केली आणि सुपर बॉटम्समध्येही गुंतवणूक केली आहे. एकंदरीत, असे म्हणता येईल की चित्रपटांव्यतिरिक्त, आलिया भट्ट खूप कमाई करते आणि यामुळेच ती कमाईच्या बाबतीत इतर अभिनेत्रींपेक्षा खूप पुढे आहे.
सैफ अली खान प्रकरणानंतर आलिया-रणबीरचा राहाबाबत घेतला मोठा निर्णय, काय म्हणाले सेलिब्रिटी कपल ?