लेक चालली सासरला! BMW गाडीतून अनुष्काचे पुण्यात जंगी स्वागत, पती निखिलसह आलिशान घरात केला गृहप्रवेश
मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार विवाहबंधनात अडकल्याचे पाहायला मिळते. अभिनेत्रींच्या शाही विवाह सोहळ्याची सगळ्यांचं कायमच आतुरता असते. अशाच एका मराठमोळ्या जोडीची सोशल मीडियावर मोठी चर्चा पाहायला मिळत आहे. मराठी अभिनेत्री अनुष्का सरकटे आणि अभिनेता निखिल चव्हाण यांचा विवाह सोहळा छत्रपती संभाजीनगरमध्ये २४ जूनला मोठ्या थाटात पार पडला. अनुष्का आणि निखिलच्या विवाह सोहळ्यासाठी मराठी मनोरंजनसृष्टीतील अनेक कालांतरानी हजेरी लावली होती. ‘लागिरं झालं जी’ मालिकेची टीम, निर्माती श्वेता शिंदे, निखिलची मानलेली बहीण व अभिनेत्री शिवानी बावकर, भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, मनमीत पेम, किरण गायकवाड, वैष्णवी कल्याणकर यांच्यासह मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकार विवाह सोहळ्याला उपस्थित होते. कुटुंबीय आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीत मोठ्या थाटात अनुष्का आणि निखिल विवाह बंधनात अडकले.(फोटो सौजन्य – instagram)
‘सावित्रीबाई जोतीराव फुले’ मालिकेत झळकणार शिरूरची अनघा शिंदे; शिरूरच्या शिरपेचात मानाचा तुरा
अनुष्का आणि निखिलचा विवाह सोहळा जेवढा थाटामाटात पार पडला तितक्याच थाटामाटात तिचा आलिशान घरात गृहप्रवेश सुद्धा झाला. सरकटे कुटुंबीयांनी अनुष्काची माहेरवरून भावुक होत पाठवणी केली. अनुष्काचे माहेरचे कुटुंब मोठे असल्यामुळे तिने उखाण्यात प्रत्येकाची नाव सुद्धा सांगितली. बालपणापासूनच तिला कुटुंबीयांचे खूप जास्त प्रेम मिळाले आहे. माझे बाबा ज्या मुलावर हात ठेवणार त्याच्याशीच मी लग्न करणार’ हे अनुष्काचे पहिल्यापासूनच ठरले होते. त्यामुळे तिने तिच्या बाबाच्या आवडीप्रमाणे निखिल चव्हाणसोबत लग्नगाठ बांधली. याशिवाय निखिलने सुद्धा सरकटे कुटुंबीयांची मनं जिंकून घेतली आहेत आणि तो आता त्यांचा लाडका जावई सुद्धा झाला आहे.
अनुष्काच्या माहेरचे तिची सासरी पाठवणी करताना खूप भावुक झाले होते. त्यानंतर निखिल आणि अनुष्का पुण्यात पोहचले. अनुष्काने सासरी आलिशान BMW गाडीतून एन्ट्री घेत नव्या घरात पहिले पाऊल टाकले. नव्या सुनेच्या स्वागतासाठी राहत्या घरात सुंदर फुलांची सजावट सुद्धा करण्यात आली होती. त्यानंतर निखिल आणि अनुष्काचे औक्षण करत माप ओलांडून निखिलच्या साथीने अनुष्काने सासरी गृहप्रवेश केला. गृहप्रवेश केल्यानंतर दोघांनी देवाचे व घरातील वरिष्ठांचे आशीर्वाद घेतले आणि स्वयंपाक घरात जाऊन पूजा केली. याचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
निखिल आणि अनुष्काचा विविह सोहळा मोठ्या शाही थाटात छत्रपती संभाजीनगरमध्ये पार पडला. या दोघांची पहिली भेट कारभारी लयभारी मालिकेच्या सेटवर झाली होती. त्यानंतर त्यांच्यामध्ये छान मैत्री झाले आणि मैत्री रूपांतर प्रेमात झाले. अखेर २४ जूनला अनुष्का सरकटे आणि निखिल चव्हाण यांचा विवाह सोहळा मोठ्या थाटात पार पडला.






