छत्रपती संभाजीनगर : गायक अरिजित सिंग संदर्भात एक मोठी बातमी समोर येत आहे. रविवारी छत्रपती संभाजीनगरमध्येअरिजितच्या लाईव्ह शो चं आयोजन करण्यात आलं होतं. या कॉन्सर्टदरम्यान अरिजितला दुखापत झाल्याची माहिती समोर येत आहे. शो दरम्यान अरिजितच्या एका फॅनने त्याचा हात ओढला. यामुळे अरिजित जखमी झाला. अरिजितने न ओरडता चाहत्याला समजवण्याचा प्रयत्न केला. या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.
[read_also content=”विमान नगरमध्ये इमारतीला भीषण आग; अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी, सुदैवाने जिवीतहानी नाही https://www.navarashtra.com/maharashtra/fire-in-building-at-viman-nagar-4-fire-engines-at-the-scene-no-casualties-reported-nrps-396744.html”]
मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर मध्ये रविवारी लाइव्ह परफॉर्मन्स दिला, जिथे एका चाहत्याने त्याचा हात ओढला आणि त्याला दुखापत झाली. ही घटना घडली तेव्हा तो प्रेक्षकांशी संवाद साधत होता, त्यानंतर मैफिली थांबवण्यात आली. या कार्यक्रमाचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये अरिजित धीराने चाहत्याशी संवाद साधताना दिसत आहे. चाहत्याने हे कृत्य केल्यानंतर अरिजित सिंगने त्याला स्टेजवरच समजावण्यास सुरुवात केली.
व्हिडिओमध्ये अरिजित सिंगफॅनला म्हणताना दिसतोय की, ‘तुम्ही माझा हात का खेचत होता’. ‘तुम्ही इथे मजा करायला आलात, काही हरकत नाही. पण जर मी परफॉर्म करू शकत नाही, तर तुम्ही मजा करू शकत नाही, ही अगदी साधी गोष्ट आहे. पण तुम्ही मला असे खेचत आहेस, आता माझे हात थरथरत आहेत. मी शो इथेचं सोडू का?’
Arijit Singh was injured during his concert in Aurangabad after a fan of his pulled his hand. #ArijitSingh #ArijitSinghLive #Arijit #Injured #viralvideo #ViralVideos #viral2023 #India pic.twitter.com/XVVqz0n1CC
— Anjali Choudhury (@AnjaliC16408461) May 8, 2023