(फोटो सौजन्य -इन्स्टाग्राम)
सुपरस्टार ऋषभ शेट्टी सध्या आपल्या ब्लॉकबस्टर चित्रपट ‘कांतारा चैप्टर 1’ च्या यशाचा जल्लोष साजरा करत आहे. या चित्रपटाने आतापर्यंत देशभरातून 493.75 कोटींची कमाई केली असून तो लवकरच ५०० कोटींच्या क्लबमध्ये पोहोचण्याच्या मार्गावर आहे.
या यशाच्या पार्श्वभूमीवर ऋषभ शेट्टी नुकतेच अमिताभ बच्चन यांच्या लोकप्रिय क्विझ शो ‘कौन बनेगा करोड़पति सीझन १७’ च्या ‘जूनियर्स वीक’ विशेष भागात पाहुणे म्हणून सहभागी झाले. या एपिसोडमध्ये ऋषभ यांनी बिग बींशी त्यांच्या चित्रपटांबद्दल, जीवनातील अनुभवांबद्दल आणि वैयक्तिक आठवणींबद्दल मनमोकळ्या गप्पा मारल्या.
या वेळी अमिताभ बच्चन यांनीसुद्धा एक खास अनुभव शेअर केला. त्यांनी सांगितलं की, “कांतारा” पाहिल्यानंतर त्यांच्यावर आणि त्यांच्या मुली श्वेता बच्चनवर खूप खोल प्रभाव पडला.त्यांची मुलगी श्वेता बच्चन ‘कांतारा’ पाहिल्यानंतर खूप अस्वस्थ झाली होती.
Big Boss 19: ”प्रणीत तर माझा भाऊच…” मराठमोळ्या प्रणीत मोरेचं शिव ठाकरेकडून कौतुक
ऋषभ यांना सांगितलं की ते शाळेत असताना फारसा हुशार नव्हते, पण आयुष्यातील अनुभवांनी त्यांना खूप काही शिकवलं. याच दरम्यान त्यांनी सुपरस्टार रजनीकांत यांच्यासोबत झालेल्या एका भेटीचा किस्सा ही शेअर केला.ते म्हणालं,“चित्रपटानंतर रजनीकांत सर मला भेटू इच्छित होते. पण मला ठरलेलं वेळापत्रक माहीत नव्हतं. प्रॉडक्शन हाऊसने मला अचानक सांगितले आणि मला वेष्टी (तमिळनाडूमध्ये घातले जाणारे धोतर) घालण्याची संधीही मिळाली नाही. जेव्हा मी त्यांना भेटलो तेव्हा मला अजूनही पश्चात्ताप आहे की त्यांनी ‘वेष्टी’ घातली होती आणि मी जीन्स घातली होती.”
स्वप्निल जोशी आणि भाऊ कदम ऑनस्क्रीन एकत्र, ‘प्रेमाची गोष्ट २’ मधून उलगडणार नवी केमिस्ट्री
अमिताभ बच्चन म्हणाले, “सर्वप्रथम तुमचे चित्रपट अजून पाहिले नाहीत याबद्दल मी माफी मागतो… पण माझी मुलगी श्वेता, ‘कांतारा’ बघायला गेली होती आणि तिला काही दिवस झोप येत नव्हती. ती तुमच्या अभिनयाने, विशेषतः शेवटच्या दृश्याने खूप प्रभावित झाली.”