(फोटो सौजन्य -इन्स्टाग्राम)
‘बिग बॉस १९’ मराठमोळ्या प्रणीत मोरेने आपल्या खेळाने सर्व प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. ‘बिग बॉस १९’ सुरू होऊन आता सुमारे ५० दिवस झाले आहेत, या सीझनमध्ये टीव्ही, सिनेमा आणि सोशल मीडियामधील अनेक लोकप्रिय चेहरे सहभागी झाले आहेत. प्रणीतचा खेळ संयमी, आणि सडेतोड असल्यामुळे सोशल मीडियावर त्याला प्रचंड पाठिंबा मिळत आहे. मराठी मनोरंजनसृष्टीतील अनेक कलाकार आणि कंटेंट क्रिएटर्सही प्रणीतच्या पाठीशी उभे आहेत.याच दरम्यान, ‘बिग बॉस मराठी २’चा विजेता आणि लोकप्रिय रिअॅलिटी स्टार शिव ठाकरे यानंही प्रणीतच्या खेळाचं कौतुक केलं.
शिव ठाकरेनं ‘Telly Masala’ ला दिलेल्या मुलाखतीत आपल्या आवडत्या स्पर्धकांविषयी सांगितलं आहे. शिव म्हणाला,“बसीर अली आणि प्रणीत माझे जवळचे मित्र आहेत. बसीर माझ्यासोबत रोडीजमध्ये होता, आणि प्रणीत तर माझा भाऊच आहे. तो खूपच चांगला खेळतोय.”शिव फक्त या दोघांपुरता थांबला नाही. त्याने ‘बिग बॉस १९’मधील इतर स्पर्धकांबद्दलही आपली मतं दिली आणि त्यांच्या खेळाचं कौतुक केलं.
पुढे शिव म्हणाला, “अभिषेकसुद्धा चांगला खेळत आहे. अश्नूर कौरदेखील चांगली खेळत आहे. हे लोक भांडण, वादविवाद करताना कोणतीच मर्यादा ओलांडत नाहीयेत. अभिषेक बजाज, प्रणीत यांचा ग्रुप मला आवडतो.”
”त्यांच्या पायाशी मी”…, वडील Pankaj Dheer यांच्या निधनानंतर निकितीन धीरची पहिली पोस्ट
शिव ठाकरे सोशल मीडियावर कायमच सक्रिय असतो. तो अनेकदा अशा रिअॅलिटी शोमधील अपडेट्सवर लक्ष ठेवून असतो. तसंच सोशल मीडियाद्वारे तो त्याच्या प्रतिक्रियासुद्धा व्यक्त करताना दिसतो. अशातच त्यानं ‘बिग बॉस १९’मधील त्याच्या आवडत्या स्पर्धकांबद्दल प्रतिक्रिया देत, त्यांच्या खेळाचं कौतुक केलं आहे.
स्वप्निल जोशी आणि भाऊ कदम ऑनस्क्रीन एकत्र, ‘प्रेमाची गोष्ट २’ मधून उलगडणार नवी केमिस्ट्री
‘बिग बॉस १९’चा हा आठवडा नाट्यमय वळणांनी भरलेला दिसून आला आहे. स्पर्धकांमध्ये निर्माण झालेले वाद, मतभेद आणि भावनिक क्षण यामुळे घराचं वातावरण चांगलंच तापलेलं आहे. विशेषतः गेल्या दोन दिवसांत परिस्थिती आणखी गंभीर झाली आहे. सलमान खान आठवड्याचा आढावा घेण्यासाठी ‘वीकेंड का वार’ घेऊन आला आहे. बिग बॉस १९ चा हा आठवडा अॅक्शनने भरलेला आहे, कारण दिवाळीच्या अगदी आधी वीकेंड का वार आहे, त्यामुळे सलमान खान आणि बिग बॉस तुमची दिवाळी खास बनवण्यासाठी कोणतीही कसर सोडणार नाहीत. शोचा एक नवीन प्रोमो व्हिडिओ रिलीज झाला आहे ज्यामध्ये अमाल मलिकपासून मालती चहर आणि नीलमपासून गौरव खन्नापर्यंत सर्वांनाच फटकारताना दिसत आहे.