फोटो सौजन्य - Bigg Boss
“बिग बॉस १९” सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगवत आहे. याचे कारण म्हणजे क्रिकेटपटू दीपक चहरची बहीण मालती चहर, जी घरात वाइल्डकार्ड एन्ट्री म्हणून आली आणि तिने प्रवेश करताच मॉडेल आणि कंटेंट क्रिएटर तान्या मित्तलला उघड केले. मालतीने तिच्या संघर्षाच्या दाव्यांवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले नाही तर तिच्या जीवनशैलीचा आणि जुन्या व्हिडिओंचाही उल्लेख केला. परिणामी, तान्याचा चेहरा फिका पडला, ज्यामुळे नीलम गिरीही स्तब्ध झाली. बिग बाॅसने त्याच्या सोशल मिडियावर एक नवा प्रोमो शेअर केला आहे यामध्ये आता घरातील वातावरण तणावाचे होताना दिसणार आहे.
मालती चहर हिला घरामध्ये येऊन दोनच दिवस झाले आहेत पण संपूर्ण घराचे वातावरण हे बदलले आहे. तिने सर्वात आधी घरामध्ये येतात तान्या मित्तलचे पत्ते उघडले आहेत. तानिया मित्तलचे अनेक मोठे खुलासे तीने येतात बिग बॉसच्या घरामध्ये केले आहेत. कालच्या भागांमध्ये चेटकिणीचा टास्क बिग बॉसने डिझाईन केला होता. यामध्ये तान्याला पुलमध्ये ढकलण्याचा संधी मालती चहरला देण्यात आली होती. तिने तिला पुलमध्ये जोरात ढकलले.
‘बिग बॉस’च्या घरात पुन्हा जेवणावरून वाद, नीलम आणि फरहानामध्ये झाले भांडण; अभिषेक- शाहबाज देखील भिडले
पुढे प्रोमोमध्ये दाखवण्यात आले आहे की, पुलमध्ये ढकलल्यानंतर तान्या रडत होती. यावेळी पूलमध्ये ढकलल्यानंतर मालती ही तान्याकडे जाते आणि तिला विचारते तुला रडायला काय झाले यावरून. तानिया रडत रडत उत्तर देत असते तेव्हा मालती तिला म्हणते की रडत राहा मी आणखी तुला पुलमध्ये ढकलणार आहे. त्यानंतर पुढे दाखवण्यात आले आहे की मालती ही घरातल्या सदस्यांना सांगते की तिला माहिती होते की पाण्यातील टास्क आहे तर तिने साडी घालण्याची काय गरज होती तुम्हीच तिला नोटीस नाही करत आहात का? मग तुम्ही काय करत आहात एवढे दिवस या घरात.
Task ke dauraan Tanya hui emotional, Malti ko lagte hai uske reactions completely irrational! 👀 Dekhiye #BiggBoss19, Mon-Sun raat 9 baje @JioHotstar aur 10:30 baje @ColorsTV par.#Vaseline #AppyFizz @danubeprop @CitroenIndia @vzyindia {BB, Bigg Boss, BB19, Bigg Boss 19}… pic.twitter.com/1XsfGPBXqI — Bigg Boss (@BiggBoss) October 7, 2025
मालती चहर आणि तान्या मित्तल यांचा हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. प्रेक्षक दोन गटात विभागले गेले आहेत: काही जण मालतीच्या स्पष्टवक्त्याचे कौतुक करत आहेत, तर काही जण म्हणतात की राष्ट्रीय टेलिव्हिजनवर तान्याला अशा प्रकारे उघड करणे अन्याय्य होते. पण काहीही असो, या संघर्षामुळे बिग बॉस १९ च्या घरात वातावरण तापले आहे.