बॉलीवूडमध्ये एकीकडे लग्नसराईचा सिझन आहे तर दुसरीकडे अनेक सेलेब्रिटी त्यांचा अनेक वर्षाच्या संसारातुन फारकत घेताना दिसत आहे. बॉलीवूडची ‘खल्लास गर्ल’ म्हणून प्रसिद्ध असलेली अभिनेत्री ईशा कोपीकरनं (Isha Koppikar) तिच्या पतिपासून विभक्त झाली आहे. ईशाने रेस्टॉरंट मालक पती टिमी नारंगसोबत (timmy narang) लग्न केले होते. त्यांना 9 वर्षांची मुलगी आहे. मात्र हे लग्न फार काळ टिकू शकले नाही. लग्नाच्या 14 वर्षानंतर दोघांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. स्वतः टीमी नारंगने याबद्दल माहिती दिली आहे.
[read_also content=”सर्वोच्च न्यायालयाचा गुजरात सरकारचा झटका, बिल्किस बानो सामूहिक बलात्कार प्रकरणी रद्द केली सरकारची माफी; दोषींना पुन्हा तुरुंगात जावं लागणार! https://www.navarashtra.com/india/supreme-court-canceled-order-of-releases-of-accuse-in-bilkis-bano-case-nrps-496052.html”]
टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, ईशा कोपीकरने टिमी नारंगनेपासून घटस्फोट आहे. दोघेही नोव्हेंबरमध्ये कायदेशीररित्या वेगळे झाले होते. घटस्फोट होताच ईशाने आपल्या 9 वर्षांच्या मुलीसह टिमी नारंगचे घरही सोडले. आता ती मुलीसह वेगळी राहात आहे. टिमी नारंगने सांगितले की, जवळपास दीड वर्ष घटस्फोटाचा विचार केल्यानंतर दोघांनीही घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये आपसी सहमतीने त्यांचा घटस्फोट झाला. या सगळ्यानंतर आपण दोघेही आपापल्या आयुष्यात पुढे जाण्यासाठी पूर्णपणे मोकळे आहोत असं तो म्हणाला.
ईशा कोप्पीकर ‘कृष्णा कॉटेज’, ‘डॉन’, ‘क्या कूल हैं हम’, ‘फिजा’, ’36 चायना टाउन’ कयामत,यांसारख्या अनेक लोकप्रिय चित्रपटांमध्ये दिसली आहे. त्यानंतर अनेक दाक्षिणात्या सिनेमांमध्येही काम केलं. 2022 मध्ये लव्ह यु लोकतंत्र या शेवटच्या हिंदी चित्रपटांमध्ये ईशा झळकली होती. आता येत्या 12 जानेवारीला रिलिज होणाऱ्या आयलन या तमिळ चित्रपटातुन इशा रुपेरी पडदयावर प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या तमिळ विज्ञान-कथा चित्रपटात शिवकार्तिकेयन, रकुल प्रीत सिंग आणि शरद केळकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
इशा आणि टिमी नारंग यांच्या प्रेमकहाणीची सुरुवात एका जिममध्ये झाली होती. एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी 2009 मध्ये लग्न केले. 14 वर्षे संसार केल्यानंतर दोघांनीही विभक्त होण्याचा निर्णय घेतला.