Chhori 2 release date and teaser, Soha Ali Khan will also be seen in a special role with Nusrat Bharuch
हॉररपटांच्या यादीत समाविष्ट असलेला ‘छोरी’ चित्रपटचा सीक्वेल आता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चार वर्षांनंतर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला पुन्हा एकदा एका भयानक दृश्यासह परतत आहे. २०२१ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘छोरी’ने प्रेक्षकांना थक्क केले. सामाजिक विषयांवर आणि लोककथांवर आधारित या चित्रपटाचे प्रेक्षक आणि समीक्षकांनी खूप कौतुक केले. आता बऱ्याच प्रतीक्षेनंतर, ‘छोरीचा’ सिक्वेल प्रदर्शित होणार आहे.
लग्नाच्या ७ महिन्यांनंतर प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री झाली आई, बाळासोबत शेअर केले कपलने रोमँटिक फोटोज्
२०२५ मध्ये अनेक वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट रिलीज होणार आहेत. त्या यादीमध्ये हॉररपटाचीही फार मोठी यादी पाहायला मिळत आहे. त्या चित्रपटाचे पोस्टर, टीझर आणि ट्रेलर पाहून प्रेक्षकांना त्याबाबतीत फार उत्सुकता पाहायला मिळत आहे. आता अशातच २०२१ मध्ये रिलीज झालेल्या ‘छोरी’ चित्रपटाच्या सीक्वेलचा टीझर पाहून आता चित्रपटाबद्दल उत्सुकता पाहायला मिळत आहे. काही तासांपूर्वीच ‘छोरी’ चित्रपटाच्या सीक्वेलचा टीझर रिलीज झाला आहे. या टीझरने सर्वांचेच लक्ष वेधले असून चित्रपटाबद्दलची उत्सुकता शिगेला पोहोचवली आहे.
नुसरत भरुचाचा ‘छोरी’नावाचा एक हॉरर चित्रपट २०२१ मध्ये आला होता. हा चित्रपट पूजा सावंत स्टारर ‘लपाछपी’ या मराठी चित्रपटाचा रिमेक होता. ‘छोरी’ला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळालं होतं. पण त्याचा मुळ चित्रपट असलेल्या ‘लपाछपी’ या चित्रपटाला प्रेक्षकांकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. दरम्यान, नुसरत आता लवकरच ‘छोरी’चा दुसरा भाग घेऊन येत आहे. निर्मात्यांनी ‘छोरी २’ च्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर केली असून टीझरही प्रदर्शित केला आहे.‘छोरी २’ चा टीझर मंगळवारी म्हणजेच, २५ फेब्रुवारीला प्रदर्शित झाला आहे. ज्यामध्ये पहिल्या भागापेक्षा जास्त भयानक आणि जास्त धोकादायक सीन्स पाहायला मिळत आहे.
‘छोरी २’ च्या माध्यमातून नुसरत पुन्हा एकदा साक्षीच्या भूमिकेत दिसणार आहे, जी तिच्या मुलीसाठी लढताना दिसणार आहे. निर्मात्यांनी टीझरमध्ये काही कॅप्शन देखील समाविष्ट केले आहेत. एका ठिकाणी निर्मात्यांनी लिहिले आहे की, “पुन्हा तेच शेत.” अजून एका ठिकाणी लिहिले आहे, “पुन्हा तीच भीती”… ‘छोरी २’ चा टीझर पाहून तुम्हाला भिती तर वाटेल. पण सोबतच डोळेही पाणावतील. नुशरत भरुचा सोबत चित्रपटात सोहा अली खानही दिसणार आहे. दोघीही एकमेकींसमोर विरुद्ध पात्रात दिसणार आहे. या चित्रपटातून सोहा प्रेक्षकांच्या भेटीला खलनायिकेच्या भूमिकेतून येणार असल्याचं टीझरवरून दिसतंय. त्यामुळे आता चित्रपटाच्या दुसऱ्या भागात प्रेक्षकांना अजून काय रंजक पाहायला मिळणार आहे. याची उत्सुकता नक्कीच लागून राहिली आहे.
‘फ्लोमध्ये बोललो, मानसिक आरोग्य ठीक नव्हते…’, समय रैनाने महाराष्ट्र सायबर सेलसमोर चूक केली कबूल…
‘छोरी’प्रमाणेच ‘छोरी २’च्या ही दिग्दर्शनाची जबाबदारी विशाल फुरिया यांनीच स्वीकारली आहे. चित्रपट लिहिण्याची जबाबदारीही त्यांच्या खांद्यावरच आहे. चित्रपट येत्या ११ एप्रिलला ‘ॲमेझॉन प्राईम व्हिडिओ’या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. बऱ्याच वर्षांनंतर सोहा देखील कोणत्या तरी चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यापूर्वी ती 2023 मध्ये ‘साउंड प्रूफ’नावाच्या एका शॉर्टफिल्ममध्ये दिसली होती. आणि आता सोहा ‘छोरी’द्वारे पुनरागमन करण्यास सज्ज झाली आहे. ‘छोरी २’व्यतिरिक्त ती ‘ब्रिज’ नावाच्या चित्रपटातही दिसणार आहे. त्याची तयारी सध्या सुरु आहे.