(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान बऱ्याच दिवसांपासून चित्रपटांपासून दूर आहे. अभिनेत्याचा शेवटचा चित्रपट ‘लाल सिंग चड्ढा’ बॉक्स ऑफिसवर खूप फ्लॉप झाला. मात्र, लवकरच अभिनेता त्याच्या ‘सीतारे जमीन पर’ या चित्रपटातून पुनरागमन करणार आहे. दरम्यान, आमिर सध्या मेडिकल थेरपी घेत असल्याची बातमी समोर आली आहे. याचा खुलासा अभिनेत्याने स्वतः केला आहे. त्यांनी सांगितले आहे की ते त्यांची मुलगी इरा खानसोबत काही दीर्घकाळ चाललेल्या समस्या सोडवण्यासाठी थेरपी घेत आहेत. अभिनेता थेरपी घेण्यामागचं कारण काय आहे जाणून घेऊयात.
इरा थेरपीसाठी प्रेरित झाली
मीडिया रिपोर्ट्सनुसार, नेटफ्लिक्स इंडियाच्या एका व्हिडिओमध्ये आमिर खान आपली मुलगी इरा खान आणि डॉक्टर विवेक मूर्ती यांच्यासोबत मानसिक आरोग्यावर चर्चा करताना दिसले. या संवादादरम्यान, अभिनेत्याने या थेरपीतून मिळालेल्या सकारात्मक अनुभवांबद्दल सांगितले. तसेच आपल्या मुलीला श्रेय देताना ते म्हणाले की इराने त्यांना ही थेरपी घेण्यास प्रवृत्त केले आहे.
अभिनेता आमिर खान म्हणाले की, ‘मला वाटतं की ज्यांना गरज वाटत असेल त्यांनी एकदा तरी थेरपी घ्यावी. ही थेरपी माझ्यासाठी खूप उपयुक्त ठरली आहे.’ अभिनेत्याने असेही सांगितले की, ‘मी आणि आमचे नाते सुधारण्यासाठी आणि दीर्घकाळ चाललेल्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी संयुक्तपणे थेरपी सत्रात सहभागी होऊ लागलो आहे.’ असे अभिनेता आमिर खान यांनी सांगितले.
अभिनेता आमिर खानबाबत बातमी वाचण्यासाठी इथे क्लीक करा
थेरपी घेण्याच्या महत्त्वाबद्दल अभिनेत्याने मांडले मत
मीडिया रिपोर्ट्सनुसार, आमिर खानने असेही सांगितले की बरेच लोक स्वतःला बुद्धिमान समजतात. त्यांना असे वाटते की ते त्याच्या समस्या सोडविण्यास सक्षम आहे परंतु थेरपीमुळे त्याचे मन अधिक चांगले समजण्यास मदत होईल. जीवन अनुभव किंवा शहाणपण प्रशिक्षित डॉक्टरांच्या मार्गदर्शनाची जागा घेऊ शकत नाही कारण डॉक्टर आवश्यक अंतर्दृष्टी प्रदान करण्यात मदत करतात.’ असे त्यांनी सांगितले. आमिर खानने असेही सांगितले की, ‘असे बरेच लोक आहेत जे कधीकधी थेरपीला मानसिक आजाराशी जोडतात. लोकांचा दृष्टिकोन वेगवेगळा असतो.’
अभिनेता आमिर खानचा येणार आगामी चित्रपट
वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, आमिर खान सध्या त्यांच्या ‘सीतारे जमीन पर’ चित्रपटासाठी चर्चेत आहेत. तसेच हा चित्रपट 25 डिसेंबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री जेनेलिया डिसूजाही दिसणार आहे. एस प्रसन्ना या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. हा चित्रपट पाहण्यासाठी चाहत्यांची आतुरता वाढली आहे.