(फोटो सौजन्य- इंस्टाग्राम)
आंध्र प्रदेश आणि तेलंगणाच्या बातम्या सध्या जास्त चर्चेत आहेत. या शहराच्या काही भागांना पुराने वेढा घातला असून यात अनेकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे पुराच्या पार्श्वभूमीवर बॉलीवूड अभिनेता आणि परोपकारी सोनू सूद लोकांना आवश्यक मदत करण्यासाठी पुढे आला आहे. एका व्हिडिओमध्ये सोनू सूदने पूरग्रस्तांबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली आणि संकटाच्या वेळी त्यांना मदत करण्याचं आव्हानं केले आहे. मदतीत प्रभावित व्यक्तींसाठी अन्न, शुद्ध पाणी, वैद्यकीय किट आणि तात्पुरता निवारा यासारख्या आवश्यक वस्तूंचा समावेश आहे. सोनू म्हणतो मदत सर्वात असुरक्षित लोकांपर्यंत पोहोचावी यासाठी त्यांची टीम अथक परिश्रम करत आहे. असे अभिनेत्याने या व्हिडीओमध्ये सांगितले.
“पुरामुळे अनेकांचे घर आणि उपजीविका गमावली आहे आणि त्यांना वाचवण्यासाठी आणि त्यांचे जीवन सामान्य करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र आले पाहिजे. आम्ही शक्य तितकी मदत पाठवण्याचा प्रयत्न करत आहोत,” पूरग्रस्त भागातील लोकांना मदत देण्यासाठी चोवीस तास काम करत असल्याबद्दल त्यांनी सरकारला देखील आव्हानं केले आहे.” असे देखील सोनू या व्हिडीओमध्ये सांगताना दिसत आहे.
कोविड-19 महामारीच्या काळात त्यांच्या परोपकारी कार्यामुळे सोनू सूद जनतेचा खरा नायक म्हणून प्रसिद्धीस आला. आणि या प्रयत्नाने त्याने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की त्याला राष्ट्रीय नायक का मानले जाते. आणि म्हणूनच तो प्रत्येक चाहत्यांचा खरा हिरो आहे.
हे देखील वाचा- Emergency Movie : कंगना रणौतचा ‘इमर्जन्सी’ चित्रपट केव्हा रिलीज होणार ? मुंबई हायकोर्टाने सेन्सॉर बोर्डाला दिले महत्वाचे आदेश
कामाच्या आघाडीवर,‘दबंग’, ‘आर राजकुमार’ आणि ‘हॅपी न्यू इयर’ यांसारख्या चित्रपटांमध्ये दिसलेला सोनू सूद आता पुन्हा एकदा पडद्यावर येण्यासाठी सज्ज झाला आहे. यावेळी त्याची जोडी जॅकलिन फर्नांडिससोबत दिसणार आहे. फतेह या चित्रपटात ही जोडी दिसणार आहे. 10 जानेवारीला हा चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. ‘फतेह’ या चित्रपटातून या अभिनेत्याने दिग्दर्शक म्हणून नवा प्रवास सुरू केला आहे. या चित्रपटात नसीरुद्दीन शाह आणि विजय राज देखील मुख्यभूमीकेत दिसणार आहेत.