फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
‘छवा’च्या प्रचंड यशानंतर अभिनेता विकी कौशल पुन्हा एका ऐतिहासिक आणि आध्यात्मिक भूमिकेसाठी सज्ज झाला आहे. तो लवकरच ‘स्त्री २’चे दिग्दर्शक अमर कौशिक यांच्यासोबत भगवान परशुराम यांच्या जीवनावर आधारित ‘महावतार’ या भव्य चित्रपटात काम करणार आहे.
चित्रपटाशी जवळच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या भूमिकेसाठी विकी कौशलने आपल्या जीवनशैलीत मोठा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. तो दारू आणि मांसाहार पूर्णपणे सोडणार असून, ही भूमिका साकारताना आध्यात्मिक शिस्त राखण्यावर तो भर देणार आहे.दरम्यान, ‘महाअवतार’ चित्रपट २०२६ च्या अखेरीस प्रदर्शित होण्याची शक्यता असून, त्याचा थिएटर रिलीज २०२८ मध्ये होऊ शकतो, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
विशेष म्हणजे, रणबीर कपूरनेही आपल्या आगामी ‘रामायण’ चित्रपटासाठी असाच निर्णय घेतला आहे. भगवान रामाच्या भूमिकेसाठी रणबीरने दारू आणि मांस सोडून सात्विक आहार, नियमित व्यायाम आणि ध्यानधारणा सुरू केली आहे. आपल्या पात्रातील आध्यात्मिक शिस्त जपण्यासाठी तो पूर्णतः पवित्र जीवनशैली अवलंबत आहे.
सुरु झाली लगीनघाई ! अखेर सूरज चव्हाण अडकणार लग्नबंधनात; अंकिताने दाखवली वहिणीची झलक
याच दरम्यान, अभिनेता रणबीर कपूरनेही आपल्या आगामी नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’ चित्रपटासाठी मांस आणि दारूचा त्याग केला आहे. भगवान रामाची भूमिका साकारणाऱ्या रणबीरने सात्विक आहार, नियमित व्यायाम आणि ध्यानधारणा यांचा अवलंब सुरू केला असून, आपल्या पात्रातील आध्यात्मिक शिस्त जपण्यासाठी त्याने शाकाहारी जीवनशैली स्वीकारली आहे.
120 Bahadur: फौजी बनून एकटा लढणार नाही फरहान अख्तर, सोबत येणार यश? आता होणार खरा धमाका
विकी कौशल आणि रणबीर कपूर पहिल्यांदाच एकत्र पडद्यावर दिसणार आहेत. हे दोघे सध्या दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या आगामी ‘लव्ह अँड वॉर’ या चित्रपटाचे चित्रीकरण करत आहेत.या चित्रपटात आलिया भट्ट ही प्रमुख भूमिकेत आहे. भन्साळींच्या भव्य निर्मितीमुळे या चित्रपटाची जोरदार चर्चा चित्रपटसृष्टीत सुरू आहे. ‘लव्ह अँड वॉर’ हा चित्रपट २०२६ मध्ये थिएटरमध्ये प्रदर्शित होणार असून, प्रेक्षकांना तीन मोठे स्टार्स — रणबीर, आलिया आणि विकी एकत्र पाहण्याची संधी मिळणार आहे.या चित्रपटामुळे बॉलिवूडमध्ये नव्या जोडीदारांची केमिस्ट्री पाहायला मिळणार असल्याने प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे.






