फोटो सौजन्य - Social Media
अभिनेत्रीने म्हणते “पारंपारिक नात्यांची पूर्वगत सुरु असणारी परंपरा मला नाही पटत. आधी मी मिलिंद सोमणसोबत होते. त्यानंतर प्रेमाकडे आणि नात्यांकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोन मी बदलला. पुढे Mauro Gazzi माझ्या आयुष्यात आला. त्यांनतर मी कोणत्याही ठराविक चौकटीशिवाय Open Relationship स्वीकारले.” आता Open Relationship म्हणजे काय? याविषयी सांगताना शहाना म्हणते “Open Relationship म्हणजे माझ्यासाठी प्रामाणिकपणा आणि नात्यात खुला संवाद असणे. माझे ज्या व्यक्तींसोबत भावनिक संबंध आहेत, ती नाती माझ्यासाठी मुळीच casual किंवा timepass नाहीत. या नात्यांमध्ये कधी मैत्री आहे, कधी भावनिक नातं आहे तर कधी शारीरिक संबंधही असू शकतात.”
shahana म्हणते “एका व्यक्तीचे जसे अनेक मित्र असतात. तसं मीही प्रेमाकडे एका वेगळ्या मताने पाहते.” Shahana म्हणते “माझ्याकडे खूप प्रेम आहे, मग मी ते प्रेम फक्त एकाच व्यक्तीपुरतं मर्यादित का ठेवावं? माझ्या सर्व नात्यांबद्दल माझ्या सर्व जोडीदारांना माहिती आहे. मी त्यांच्यापासून एकही गोष्ट कधी लपवून ठेवली नाहीये.”
कोण आहे अभिनेत्री Shahana Goswami?
अभिनेत्री शहाना गोस्वामीने अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिने ‘Heroine’, ‘Zwigato’ आणि ‘Santosh’ यांसारख्या चित्रपटांमधून प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. दरम्यान, शहाना गोस्वामी शेवटची ‘Despatch’ या ZEE5 वरील क्राइम ड्रामा चित्रपटात झळकली होती. शहानाने ती सध्या “Open Relationship” मध्ये असल्याचे सांगत तिच्या आयुष्यात एकच “Primary Partner” नसल्याचाही खुलासा केला.






