फोटो सौजन्य - Social Media
काय म्हणाली Neha Dhupia?
Neha Dhupia नुकतीच तिच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळातील काही आठवणी शेअर करताना भावूक झाली. सिनेसृष्टीत नवीन असताना आलेल्या एका अनुभवाने तिला अनेक वर्ष मानसिक त्रास सहन करावा लागल्याचे तिने सांगितले. नेहा म्हणाली, “मी एका मालिकेसाठी ऑडिशन द्यायला गेले होते. त्यावेळी मी एका Casting Director च्या गाडीत बसले होते. तो माझ्याकडे सतत पाहत होता. मी त्याच्याकडे पाहून हसले, तर त्याने मला थेट सांगितलं की, ‘तू हसताना चांगली दिसत नाहीस. तू हसली नाहीस तर जास्त चांगली दिसशील.’” त्या टिप्पणीमुळे आपल्या आत्मविश्वासावर मोठा परिणाम झाल्याचे नेहाने सांगितले. “माझं हास्य अरुंद असल्यामुळे त्याने असं म्हटलं होतं. त्यानंतर काही दिवसांनी मी Femina Miss India 2002 हा किताब जिंकला, पण त्या काळातील माझ्या एकाही फोटोमध्ये मी हसताना दिसत नाही,” असे ती म्हणाली. या अनुभवाचा तिच्या मनावर इतका खोल परिणाम झाला होता की, त्या मानसिक धक्क्यातून बाहेर पडण्यासाठी तिला तब्बल ८ ते १० वर्षांचा काळ लागला, असेही नेहाने स्पष्ट केले.
‘या’ नवीन कार्यक्रमात झळकतेय नेहा धुपिया?
Neha Dhupia आणि Angad Bedi सध्या त्यांच्या नव्या ‘Double Date’ या चॅट शोमुळे चर्चेत आहेत. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ट्रेलरमध्ये हशा, धमाल गेम्स, मोकळ्या गप्पा आणि सेलिब्रिटी जोड्यांसोबतचे खास क्षण पाहायला मिळत आहेत. इंडस्ट्रीतील लोकप्रिय कपल्स, मित्र आणि हटके जोड्यांसोबत रंगणारा हा शो प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची भन्नाट मेजवानी ठरणार आहे. विनोद, मैत्री, मजेशीर स्पर्धा आणि अनफिल्टर्ड संवादांचा खास संगम या शोमध्ये पाहायला मिळणार आहे.
‘Double Date’ या शोमागील कल्पनेबद्दल बोलताना Neha आणि Angad यांनी सांगितले की, “आम्हाला एकत्र काहीतरी असे निर्माण करायचे होते जे फक्त आम्हालाच नव्हे तर प्रेक्षकांनाही मनापासून एन्जॉय करता येईल. मुलाखती घेण्याचा आणि देण्याचा अनुभव आम्ही दोघांनी घेतला आहे. त्यामुळे पाहुण्यांना कोणत्याही दबावाशिवाय स्वतःसारखे वागता येईल, मोकळेपणाने हसता, मजा करता आणि भावना व्यक्त करता येतील अशी एक कम्फर्टेबल जागा आम्ही तयार करण्याचा प्रयत्न केला.” ते पुढे म्हणाले, “या शोमुळे आम्हाला आमच्या जवळच्या मित्रांसोबत भन्नाट अनुभव घेता आले. नवीन गोष्टी ट्राय करण्याची, वेड्यासारखी मजा करण्याची आणि अनेक खास आठवणी तयार करण्याची संधी मिळाली. पिझ्झा बनवण्यापासून बॉलिंग, गो-कार्टिंग आणि अनेक मजेदार अॅक्टिव्हिटीजमध्ये आम्ही सहभागी झालो. प्रत्येक क्षण हास्य, धमाल, प्रामाणिकपणा आणि निव्वळ आनंदाने भरलेला होता. आमच्यासाठी हा प्रवास खरोखरच अविस्मरणीय ठरला.”






