(फोटो सौजन्य- इंस्टाग्राम)
राज कपूरचा नातू आणि बॉलिवूड अभिनेता आदर जैन लवकरच त्याची पहिली क्रश आणि गर्लफ्रेंड अलेखा अडवाणीसोबत लग्न करणार आहे. गेल्या वर्षी दिवाळीत आदरने त्याची प्रेमिका अलेखासोबतचे नाते अधिकृत केले होते. आता दोघांची एंगेजमेंट झाली आहे. याचीच झलक अभिनेत्याने सोशल मीडियावर शेअर केली आहे. आदर जैनने त्याची गर्लफ्रेंड अलेखा अडवाणीला समुद्र किनाऱ्यावर प्रपोज केले आहे. आदर आणि अलेखाचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तसेच अभिनेत्याने इन्स्टाग्रामवर गर्लफ्रेंड अलेखासोबतचे एंगेजमेंटचे फोटो शेअर केले आहेत.
आदर जैन करणार लग्न
आदर जैन आणि अलेखा अडवाणी या शेअर केलेल्या फोटोमध्ये रोमँटिक दिसून येत आहेत. आदरने अलेखाला समुद्र किनाऱ्यावर दिव्यांनी वेढलेल्या सुंदर ठिकाणी सरप्राइज देऊन तिला आश्चर्यचकित केले. अभिनेत्याने चेक निळा-पांढरा शर्ट आणि पांढरी पँट घातली होती. आदरने तिला गुडघ्यावर बसून प्रोपोज केले. आणि गर्लफ्रेंड अलेखाला त्याने अंगठी घातली. तसेच अलेखाने पिवळ्या रंगांचा ड्रेस घातला असून ती या ड्रेसमध्ये खूप सुंदर दिसत होती. या रोमँटिक शेअर केलेल्या फोटोवरून दोघांचेही एकमेकांवर किती प्रेम आहे हे स्पष्टपणे दिसून येते.
अलेखा ही आदरची पहिली क्रश होती
हे फोटो शेअर करताना आदर जैनने सांगितले की, अलेखा त्याची पहिली क्रश आणि बेस्ट फ्रेंड आहे. कॅप्शनमध्ये अभिनेत्याने लिहिले, “माझी पहिली क्रश, माझी बेस्ट फ्रेंड आणि आता माझं शेवटचं प्रेम” असे लिहून त्याने अंगठी आणि हार्ट इमोजी देखील शेअर केले. तिची चुलत बहीण रिद्धिमा कपूर, करीना कपूर खान, करिश्मा कपूर, अंशुला कपूर आणि शनाया कपूर यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी आदरला त्याच्या एंगेजमेंटबद्दल अभिनंदन केले आहे.
हे देखील वाचा- ‘स्त्री 2’ च्या यशानंतर राजकुमार राव ॲक्शन सिनेमात झळकणार, सोशल मीडियावर शेअर केली झलक!
तारा सुतारियाला अभिनेत्याने केले होते डेट
अलेखापूर्वी आदर जैन तारा सुतारियाला डेट करत होता. दोघांनी 2020 मध्ये त्यांचे नाते अधिकृत केले. तारा प्रत्येक सण किंवा विशेष प्रसंगी जैन किंवा कपूर कुटुंबासोबत एकत्र दिसायची. पण जानेवारी 2023 मध्ये तारा आणि आदरच्या ब्रेकअपच्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला. मात्र, ब्रेकअपचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. नोव्हेंबर 2023 मध्ये, आदर पहिल्यांदा अलेखासोबत दिसला होता.