(फोटो सौजन्य -इन्स्टाग्राम)
या चित्रपटाची कथा आणि पटकथा कपिल भोपटकर यांनी लिहिली असून, दिग्दर्शन अंशुल शर्मा यांनी केले आहे. चित्रपटात आर. मधवन यांचाही महत्त्वाचा रोल असून ते रकुल प्रीतच्या आई-वडिलांच्या भूमिकेत दिसणार आहेत.चित्रपटाचे शूटिंग पंजाब, मुंबई आणि लंडनमध्ये झाले. आहे या चित्रपटाचे OTT अधिकार नेटफ्लिक्सकडे असून, जानेवारी २०२६ मध्ये ते स्ट्रीमिंगसाठी उपलब्ध होणार आहे.
सॅकनिल्कच्या अहवालानुसार, अजय देवगणच्या “दे दे प्यार दे २” ने पहिल्या दिवशी ८.५० कोटींची कमाई केली. त्याची हिंदी ऑक्युपन्सी १४.०५% होती. शोच्या बाबतीत, सकाळचे शो ७.४६%, दुपारचे शो १०.६६%, संध्याकाळचे शो १२.८०% आणि रात्रीचे शो २५.२६% होते. या येत्या आठवड्याच्या शेवटी चित्रपटाची कमाई आणखी वाढण्याची अपेक्षा आहे. कलाकारांच्या विनोदाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
‘थामा’ किती मागे?
अजय देवगणचा ‘दे दे प्यार दे 2’ आयुष्मान खुरानाचा ‘थमा’ रेकॉर्ड तोडण्यात अपयशी ठरला आहे. आयुष्मान खुराना आणि रश्मिका मंदान्ना यांच्या ‘थामा’ने पहिल्या दिवशी 24 कोटींची कमाई केली. या आकडेवारीनुसार, आयुष्मान खुरानाचा ‘थमा’ अजय देवगण आणि रकुल प्रीत सिंगच्या ‘दे दे प्यार दे 2’पेक्षा 15.5 कोटींनी पुढे आहे. मात्र, ‘दे दे प्यार दे 2’चा हा आकडा आगामी वीकेंडमध्ये वाढू शकतो.






