(फोटो सौजन्य - x अकाउंट)
अभिनेता शाहरुख खानने ‘द लायन किंग’ आणि ‘मुफासा’ या हॉलिवूड चित्रपटांमध्ये आपल्या मुलांसोबत मुख्य भूमिका साकारल्यानंतर, आता अभिनेता अजय देवगण हॉलिवूडच्या नवीन चित्रपट ‘कराटे किड: लेजेंड्स’ मध्ये त्याचा मुलगा युगसोबत पदारपण करणार आहे. चित्रपटाच्या हिंदी आवृत्तीत, अजय देवगण मिस्टर हानचा आवाज असेल तर त्यांचा मुलगा युग देवगण ली फोंगचा आवाज म्हणून पदार्पण करणार आहे. हा चित्रपट या महिन्यात प्रदर्शित होत आहे. तसेच हा चित्रपट पाहण्यासाठी चाहते उत्सुक देखील आहे. तसेच युग देवगणला पाहण्यासाठी चाहते आतुर आहेत.
हॉलिवूड चित्रपटांच्या डब केलेल्या आवृत्त्या केवळ हिंदीमध्येच नव्हे तर तमिळ, तेलगू, कन्नड आणि मल्याळम भाषेतही भारतात खूप लोकप्रिय आहेत. ‘स्पायडरमॅन’ हा चित्रपट भोजपुरी भाषेतही डब करण्यात आला आहे. ही लोकप्रियता पाहून, यावेळी सोनी पिक्चर्स एंटरटेनमेंटने अभिनेता अजय देवगण आणि त्याचा मुलगा युगवर पैज लावली आहे. हे दोघेही ‘कराटे किड: लेजेंड्स’ चित्रपटातील मुख्य पात्रांचे डबिंग करणार आहेत. हा चित्रपट ३० मे रोजी भारतात प्रदर्शित होणार आहे. ज्यामध्ये अभिनेता जॅकी चॅन आणि जोशुआ जॅक्सन, सॅडी स्टॅनली, मिंग-ना वेन, अरामिस नाइट यांसारखे कलाकार काम करताना दिसणार आहेत.
‘कराटे किड: लेजेंड्स’ या चित्रपटातील मिस्टर हानच्या भूमिकेला अजय देवगण आवाज देत आहे, ही व्यक्तिरेखा जॅकी चॅनने साकारली आहे. याचा अर्थ असा की चित्रपटाच्या हिंदी आवृत्तीत, अजय देवगण मार्शल आर्ट्स चित्रपटांचे दिग्गज जॅकी चॅनच्या व्यक्तिरेखेसाठी आवाज देत आहे. तर युग देवगणने हिंदी आवृत्तीत बेन वांगचा आवाज दिला आहे, जो चित्रपटातील मुख्य पात्र म्हणजेच ली फोंगची पडद्यावर भूमिका साकारतो.
युग देवगन अलीकडेच अजय देवगनच्या ‘सन ऑफ सरदार २’ चित्रपटाच्या सेटवर दिसला होता आणि या चित्रपटाद्वारे तो हिंदी चित्रपटांमध्ये पदार्पण करणार असल्याची बरीच चर्चा होती. पण, ‘अमर उजाला’शी खास संवाद साधताना काजोल म्हणाली की ती फक्त एक अफवा होती. आता युग या आंतरराष्ट्रीय चित्रपटाच्या हिंदी डबिंगने त्याच्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात करणार आहे. त्याने आधीच त्याचे डबिंग सुरू केले आहे आणि डबिंगशी संबंधित लोकांच्या मते, युगच्या आवाजात एक वेगळाच अनुनाद आहे.
‘कराटे किड: लेजेंड्स’ हा चित्रपट एका प्रशिक्षकाची आणि त्याच्या शिष्याची कथा आहे जी वर्षाच्या सुरुवातीपासूनच प्रौढ आणि मुले दोघेही पाहण्यास उत्सुक आहेत. आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रलंबीत चित्रपटांपैकी एक असलेल्या ‘कराटे किड: लेजेंड्स’ या चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग लवकरच सुरू होणार आहे. ‘मिशन इम्पॉसिबल’ फ्रँचायझीचा शेवटचा चित्रपट ‘फायनल रेकनिंग’ या शनिवारी प्रदर्शित झाल्यानंतर दोन आठवड्यांनी प्रदर्शित होणाऱ्या ‘कराटे किड: लेजेंड्स’ या चित्रपटाबद्दल देशातील चित्रपटगृह मालकांमध्ये खूप उत्सुकता आहे.