(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
कपिल शर्मा सध्या त्याच्या द ग्रेट इंडियन कपिल शो शोमुळे चर्चेत आहे. कधीकधी हा शो कॉमेडी शो असला तरी वादातही अडकतो. अलिकडेच एका एपिसोडमुळे वाद निर्माण झाला आहे. या शोचा तिसरा सीझन सुरू असून, आतापर्यंत या शोमध्ये अनेक बॉलीवूड कलाकरांनी हजेरी लावली आहे. अलीकडेच एका भागात घडलेल्या घटनेमुळे हा शो वादात अडकला आहे. फिरोज नाडियाडवाल यांनी नेटफ्लिक्स आणि द ग्रेट इंडियन कपिल शो ला २५ कोटी रूपयांची नोटीस पाठवली आहे.
प्रिया मराठेच्या निधनानंतर शंतनू मोघेची माध्यमांसमोर पहिलीच प्रतिक्रिया; म्हणाला तिला वेळ देणं….
द ग्रेट इंडियन कपिल शोच्या अलिकडच्या भागात अक्षय कुमार त्याच्या जॉली एलएलबी ३ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आला होता. सेटवर सर्वांना मनोरंजन करण्यासाठी, किकू शारदा ‘हेरा फेरी’ मधील बाबुरावच्या वेशात आला आणि त्याने एक शानदार अभिनय सादर केला. यानंतर, निर्माते फिरोज नाडियाडवाला यांनी नेटफ्लिक्स आणि शोच्या निर्मात्यांना २५ कोटी रुपयांची कायदेशीर नोटीस पाठवली आणि आरोप केला की चित्रपटातील पात्रांचा वापर त्यांच्या परवानगीशिवाय करण्यात आला आहे.
मेगा क्लिन अप ड्राइव्हमध्ये ‘वडापाव’ टीमचा सहभाग
नेटफ्लिक्सने नुकताच एक प्रोमो रिलीज केला आहे, ज्यामध्ये किकू शारदा बाबुरावच्या लूकमध्ये दिसत आहे. त्याने केवळ लूकच नाही तर त्याच्या वागण्या-बोलण्यातही कॉपी केली आहे. परवानगीशिवाय तो जाहिरातीच्या स्वरूपात सादर करण्यात आला होता.या नोटीसनुसार नाडियाडवाला यांचे म्हणणं आहे की,” बाबुराव हे पात्र आमच्या मेहनतीने आणि कल्पकतेने घडवलेलं पात्र आहे. तसेच परेश रावलजींनी यामध्ये आपला जीव ओतला आहे. कोणालाही हे पात्र परवानगीशिवाय वापरण्याचा हक्क नाही.”