(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
“धुरंधर” या चित्रपटात दानिश पांडोर रहमान द डकैत (अक्षय खन्ना) च्या चुलत भावाची भूमिका साकारत आहे. अलीकडेच, अभिनेत्याने अक्षय खन्नाच्या व्हायरल डान्स स्टेपबद्दल एक मोठा खुलासा केला. त्याने या हिट डान्स मूव्हचे कोरिओग्राफर कोणी केल्या आहेत? याबद्दल खुलासा केला आहे. तसेच “धुरंधर” चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. आणि चाहते अक्षय खन्नाच्या कामाचे देखील कौतुक करत आहेत. “धुरंधर” चित्रपटातील त्याच्या फेमस डान्स स्टेप्स अभिनेत्याने स्वतःच तयार केले आहेत असे वृत्त समोर आले आहे.
अक्षय खन्नाने डान्स स्टेप्स स्वतःच केले तयार
फिल्मीज्ञानला दिलेल्या मुलाखतीत दानिशने खुलासा केला की त्याने स्वतः “धुरंधर” मधील एका गाण्यात अक्षय खन्नासाठी बहुचर्चित डान्स स्टेप तयार केल्या होत्या. दानिश म्हणाला, “अक्षय खन्ना सरांना दिग्दर्शक आदित्य यांनी विचारले की तो नाचू शकतो का? नंतर आदित्य सर म्हणाले, ‘तुम्हाला जे काही करायचे ते करू शकता.” त्यानंतर अक्षय खन्नाने अतिशय स्टायलिश पद्धतीने स्टेप सादर केल्या आणि त्या सगळ्यांना आवडल्या.
अक्षयच्या अभिनयाचे चाहते झाले वेडे
अलीकडेच “धुरंधर” हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. रणवीर सिंग मुख्य भूमिकेत दिसत आहे, पण अक्षय खन्ना त्याच्यापेक्षा जास्त चर्चेत आहे. तो रहमान भूमिकेत खलनायकाचे पात्र साकारताना दिसला आहे. ही एक नकारात्मक भूमिका आहे. अक्षयने मोठ्या पडद्यावर ही भूमिका उत्तमरित्या साकारली आहे. चाहते सोशल मीडियावर त्याच्या अभिनयाचे कौतुक करत आहेत.
चित्रपटसृष्टी सोडून रिया चक्रवर्तीने सुरू केले ‘हे’ काम, आता ४० कोटींच्या कंपनीची मालकीण
“धुरंधर” ने बॉक्स ऑफिसवरही घातला धुमाकूळ
SACNILC नुसार, “धुरंधर” ने चौथ्या दिवशी, सोमवारी ₹२३ कोटींची कमाई केली आहे. चित्रपटाने एकूण ₹१२६ कोटींची कमाई केली आहे. आदित्य धर दिग्दर्शित “धुरंधर” मध्ये रणवीर सिंग आणि अक्षय खन्ना यांच्यासोबत संजय दत्त, आर. माधवन आणि अर्जुन रामपाल सारखे इतर प्रमुख कलाकार देखील आहेत. या संपूर्ण स्टारकास्टसह प्रेक्षकांना चित्रपटात धमाका पाहायला मिळणार आहे.






