(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
लोकप्रिय टीव्ही अभिनेता अली गोनी लवकरच टीव्ही कुकिंग शो “लाफ्टर शेफ्स ३” मध्ये दिसणार आहे. या शोपूर्वी, अभिनेत्याने त्याच्या लूकवर खूप काम केले आहे. अलीने काही महिन्यांतच ८ किलो वजन कमी केले आणि आता त्याने चाहत्यांसोबत त्याचा वजन कमी करण्याचा प्रवास देखील शेअर केला आहे. तर, अभिनेत्याचे डाएट प्लॅन काय आहे आपण हे जाणून घेणार आहोत.
नीता अंबानींचा वाढदिवस उत्साहात साजरा; गुलाबी सूटमध्ये दिसला ग्लॅमरस लूक, टीमने दिले सरप्राईज
अली गोनीने ८ किलो वजन केले कमी
अली गोनी नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असतो, जिथे तो नियमितपणे चाहत्यांसोबत फोटो आणि व्हिडिओ शेअर करताना दिसत असतो. अलीकडेच, अभिनेत्याने चाहत्यांसोबत एक नवीन व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओमध्ये अलीने त्याच्या वजन कमी करण्याच्या प्रवासाबद्दल चर्चा केली. अभिनेत्याने सांगितले की त्याने काही महिन्यांतच ८ किलो वजन कमी केले आहे. अभिनेत्याने व्हिडिओमध्ये स्वतःचा आधी आणि नंतरचा फोटो देखील समाविष्ट केला आहे, ज्यामुळे चाहते प्रभावित झाले आहेत.
अलीचे वजन कमी करण्याचे रहस्य सांगितले
हा व्हिडिओ शेअर करताना अलीने कॅप्शनमध्ये लिहिले, “तुम्ही लोक विचारत राहिलात… त्याच उत्तर इथे आहे. मी एका दिवसात काय खातो – तो प्लॅन ज्याने मला ८ किलो वजन कमी करण्यास मदत केली. @ozivanutrition ACV Moringa चे खूप खूप आभार, ज्याने मला माझ्या इच्छांवर नियंत्रण ठेवण्यास आणि ट्रॅकवर राहण्यास मदत केली. तपशीलांसाठी बायोमधील लिंकवर टॅप करा.” अभिनेता म्हणाला की तो सकाळी एवोकॅडो आणि अंडी, दिवसा डाळ, भाज्या, चिकन आणि भात आणि रात्री मटण खातो. तो संध्याकाळी ७ वाजेपर्यंत जेवण करतो. आणि असा प्लॅन करून अभिनेत्याने आपले ८ किलो वजन कमी केले.
राघव लॉरेन्सच्या ‘Kanchana 4’मध्ये हॉरर-कॉमेडीचा तडका, दोन दमदार हिरोईन्सची एन्ट्री
अभिनेता जास्मिन भसीनला करतोय डेट
अली गोनी गेल्या काही काळापासून टीव्ही आणि पंजाबी अभिनेत्री जास्मिन भसीनला डेट करत आहे. सध्या दोघे एकत्र राहत आहेत. हे जोडपे वारंवार सोशल मीडियावर एकत्र रोमँटिक फोटो शेअर करत असते. या दोघांचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. तसेच आता अली गोनी लवकरच लाफ्टर शेफ सीजन ३ मध्ये प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसणार आहे.






