(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’ सध्या भारतातील सर्वाधिक प्रतीक्षित चित्रपटांपैकी एक मानला जात आहे. ४,००० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार होणाऱ्या या प्रोजेक्टला 2026च्या दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित करण्यात येणार आहे. हा प्रोजेक्ट केवळ भव्यतेसाठीच नाही तर तांत्रिकदृष्ट्याही अत्यंत महत्त्वाकांक्षी ठरत आहे. VFX च्या माध्यमातून रामायणातील कथा अधिक प्रभावी आणि आधुनिक तंत्रज्ञानासह मोठ्या पडद्यावर मांडली जाणार आहे.
रणबीर कपूर रामायण चित्रपटात प्रभू श्रीरामाच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे चाहते त्याला या भूमिकेत पाहाण्यासाठी उत्सुक आहेत. ‘रामायण’ या चित्रपटाच्या पहिल्या भागाची शूटिंग जून 2025 मध्येच पूर्ण झाली आहे. दिग्दर्शक नितेश तिवारी आणि टीमने यासाठी खूप बारकाईने काम केलं आहे. तर आता लेटेस्ट अपडेटनुसार सिनेमाच्या VFX साठीच ३०० दिवस लागणार आहेत.
आता संपूर्ण टीम हा फायनल एडिट घेऊन पोस्ट-प्रॉडक्शनच्या पुढच्या टप्प्यावर काम करत आहे.हा प्रोजेक्ट केवळ एक भव्य दृष्य अनुभव न देता, तांत्रिक दृष्टिकोनातूनही भारतीय सिनेसृष्टीला नव्या उंचीवर नेण्याचे उद्दिष्ट घेऊन बनवला जात आहे.
रणबीर कपूर स्टारर ‘रामायण’ या बहुप्रतिक्षित चित्रपटाच्या पहिल्या भागाचे चित्रीकरण जून महिन्यातच पूर्ण झाले आहे. रामायण’ भाग १ चं शूटिंग जून महिन्यातच संपलं. तसंच नितेश तिवारींनी पहिल्या भागाचं एडिटिंगही पूर्ण केलं. त्यांनी रन टाईम निश्चित केला आहे आणि फुटेज लाईन अप केलं आहे. व्हीएफएक्सचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. टीम सध्या पोस्ट प्रोडक्शसाठी शेवटच्या एडिटिंगवर काम करत आहे.
स्वराज्याचा हुंकार मोठ्या पडद्यावर! ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ प्रेक्षकांच्या भेटीस
रिपोर्टमध्ये म्हटलं आहे की निर्माते नमित मल्होत्रा आणि त्यांची टीम पुढील वर्षी मे महिन्यापर्यंत रामायण: भाग १ चा फायनल कट तयार करतील. यानंतर दिवाळीला सिनेमा थिएटरमध्ये रिलीज होईल. सिनेमाबाबतीत निर्मात्यांकडे मोठं मार्केटिंग प्लॅनिंगही आहे जे त्या त्या वेळी केलं जाईल. ‘रामायण’आतापर्यंतचा सर्वात बिग बजेट आणि मोठा सिनेमा मानला जात आहे. येत्या काही काळात पार्ट २ चंही शूट सुरु होणार आहे.