'द काश्मीर फाइल्स' हा वादग्रस्त चित्रपट रिलीज झाला तेव्हा संपूर्ण देशात बराच गदारोळ झाला होता. 'द काश्मीर फाइल्स' रिलीज झाल्यानंतर त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या होत्या. त्यामुळे अनुपम खेर यांना X+ सुरक्षा देण्यात आली होती.
बॉलीवूड अभिनेता अनुपम खेर याना २०१५ मध्ये, विशेष सन्मान मिळाला होता. कारण अमेरिकेतील लास व्हेगास या शहराने १० सप्टेंबर हा दिवस ‘अनुपम खेर डे’ म्हणून घोषित केला. हे त्यांच्या कला आणि सिनेमातील जागतिक योगदानाचे ओळख म्हणून देण्यात आले होते. या महत्त्वपूर्ण यशाच्या नऊव्या वर्षपूर्तीनिमित्त अनुपम खेर यांनी सोशल मीडियावर हा क्षण साजरा केला आहे.
‘अनुपम खेर डे’ जाहीर झालेल्या बातमीचा एक झलकची क्लिप शेअर करताना, त्यांनी किशोर कुमारच्या ‘साला मै तो साहब बन गया’ या गाण्यावर तो संगीतबद्ध केला. सोबतच त्यांनी लिहिले, “हे नऊ वर्षांपूर्वी, १० सप्टेंबर २०१५ रोजी घडले. काहीही होऊ शकते! जय हो!!” खेर यांच्या या पोस्टमुळे त्यांच्या चाहत्यांनीही त्यांच्याबद्दल सन्मान व्यक्त केला आणि प्रेमाचा वर्षाव केला. अभिनेता रोणित बोस रॉय यांनीही खेर यांचे अभिनंदन केले.
हे देखील वाचा- मलायका अरोरावर कोसळला दु:खाचा डोंगर, वडीलांनी तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून संपवले जीवन
अनुपम खेर यांनी २०२४ मध्ये त्यांच्या ४० वर्षांच्या कारकीर्दीचा टप्पा पार केला आहे आणि या कालावधीत त्यांनी केवळ भारतातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही आपली छाप सोडली आहे. अलीकडच्या काळात त्यांनी ‘द कश्मीर फाइल्स’, ‘ऊंचाई’ आणि ‘कार्तिकेय २’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे, तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘सिल्व्हर लायनिंग्स प्लेबुक’, ‘द बिग सिक’ आणि ‘बेंड इट लाइक बेकहॅम’ यांसारख्या चित्रपटांमध्ये आणि ‘न्यू अॅम्स्टर्डम’ आणि ‘मिसेस विल्सन’ या शोमध्ये काम केले आहे. त्यांच्या आगामी प्रकल्पांमध्ये क्रीडावर आधारित चित्रपट ‘विजय ६९’ आणि ‘द सिग्नेचर’ आहेत, तसेच त्यांचा दुसरा दिग्दर्शकीय चित्रपट ‘तन्वी द ग्रेट’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.