(फोटो सौजन्य- युट्युब चॅनेल)
काही दिवसांपूर्वी, प्रसिद्ध पंजाबी गायक एपी ढिल्लन याच लेटेस्ट गाणं ओल्ड मनीचा टीझर रिलीज झाला होता, ज्यामध्ये सलमान खानची झलक आणि संजय दत्तची उपस्थिती जाहीर करण्यात आली होती. तेव्हापासून चाहते एपीच्या या गाण्याच्या रिलीजसाठी उत्सुक होते आणि आता त्यांच्या उत्साहाला पुढच्या स्तरावर नेण्यासाठी, ओल्ड मनी गाणे रिलीज करण्यात आले आहे. जे चाहत्यांना पाहता येणार आहे. ज्यामध्ये सलमान खान आणि संजय दत्त एकत्र दिसत आहेत. एपी ढिल्लनचे हे नवीन गाणं हिंसाचाराच्या विरोधात संदेश देणार आहे.
ओल्ड मनी गाणं झाले रिलीज
सलमान खान आणि संजय दत्तची जोडी बऱ्याच दिवसांपासून कोणत्या ना कोणत्या प्रोजेक्टमध्ये एकत्र दिसली आहे. एपी ढिल्लनच्या ओल्ड मनी गाण्याने हे पुन्हा एकदा शक्य झाले आहे. हे गाणं ९ ऑगस्ट रोजी म्हणजेच एपीच्या अधिकृत यूट्यूब चॅनलवर रिलीज करण्यात आले आहे. ओल्ड मनी सॉंग: एपी ढिल्लन त्याच्या मित्रासोबत टोळीयुद्ध करण्यासाठी जातो, ज्यामध्ये त्याचा मित्र मारला जातो आणि त्याला कैद केले जाते हे स्पष्टपणे या गाण्यात दिसून येत आहे.
तसेच पुढे, त्यांना वाचवण्यासाठी सलमान खान घटनास्थळी पोहोचतो आणि गोळ्या घालून शत्रूचा पराभव करतो. गाण्याच्या शेवटी, संजय दत्त प्रवेश करतो आणि तो सलमानसह एपीला हिंसाचारात भाग न घेण्याचा सल्ला देतो. ओल्ड मनी या गाण्याचे संगीत खूप आकर्षित आहे.
सलमान आणि संजयने शेअर केली पोस्ट
अभिनेता सलमान खान आणि संजय दत्त यांनी त्यांच्या संबंधित अधिकृत एक्स हँडलवर एपी ढिल्लनच्या या नवीनतम गाण्याची झलक देखील शेअर केली आहे आणि हे गाणं ऐकताना चाहत्यांना हिंसाचारात भाग घेऊ नका असे आवाहन देखील केले आहे. आता हे गाणं नुकतंच रिलीज झाले असून चाहत्यांचा या गाण्याला चांगलाच प्रतिसाद मिळत आहे.