(फोटो सौजन्य - इंस्टाग्राम)
बॉलिवूड अभिनेता वरुण धवन सध्या त्याच्या आगामी ‘बेबी जॉन’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात अभिनेता वरुण धवनसोबत कीर्ती सुरेश आणि वामिका गब्बीसह मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटात अभिनेता सलमान खान देखील कॅमिओ साकारताना दिसणार आहे. कालिस यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होत असलेल्या ‘बेबी जॉन’ चित्रपटाच्या निर्मात्यांनी दिवाळीच्या मुहूर्तावर एक मोठं सरप्राईज चाहत्यांसाठी दिलं आहे. वास्तविक, चित्रपटाचे पहिले मोशन पोस्टर रिलीज झाले असून, यामधील वरून धवनचा फर्स्ट लूक समोर आला आहे. जो पाहून चाहत्यांना चांगलाच आनंद झाला आहे. त्याचा हा लुक पाहून प्रेक्षकांना या चित्रपटाची आतुरता लागली आहे.
वरुण धवन एकदम हटके लूकमध्ये दिसला
अभिनेता वरुण धवनने त्याच्या इंस्टाग्राम हँडलवरून बेबी जॉनचे मोशन पोस्टर शेअर केले आहे. या व्हिडिओमध्ये वरुण धवनचा चेहरा कुऱ्हाडीवर काढलेला दिसत आहे आणि पार्श्वभूमीत ‘बेबी जॉन’चे टायटल सॉंग वाजत आहे. या व्हिडिओमध्ये वरुण धवनचा लूक खूपच खतरनाक दिसत आहे. हा व्हिडिओ पोस्ट करताना वरुण धवनने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘तू तयार आहेस का बेबी, बेबी जॉनचा एक्सक्लुझिव्ह टेस्टर कट चुकवू नका. १ नोव्हेंबरपासून चित्रपटगृहांमध्ये पाहता येणार आहे. बेबी जॉन या चित्रपटातील वरुण धवनचा हा लूक लोकांना आवडला आहे. एका यूजरने लिहिले की, ‘हा सर्वात मोठा ब्लॉकबस्टर चित्रपट असेल.’ तर दुसऱ्या युजरने लिहिले, ‘बेबी जॉन खतरनाक दिसत आहे.’ असे लिहून चाहत्यांनी अभिनेत्याला प्रतिसाद दिला आहे.
या दिवशी ‘बेबी जॉन’चा ट्रेलर रिलीज होणार आहे
वरुण धवन आणि वामिका गब्बी यांचा चित्रपट ‘बेबी जॉन’चा ट्रेलर अजय देवगण आणि करीना कपूरचा चित्रपट ‘सिंघम अगेन’ आणि कार्तिक आर्यनचा चित्रपट ‘भूल भुलैया 3’ दरम्यान दिसणार आहे. हे दोन्ही चित्रपट येत्या १ नोव्हेंबरला म्हणजेच उद्या बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होणार आहेत. अशा परिस्थितीत प्रेक्षकांना बेबी जॉन चित्रपटाचा ट्रेलर थिएटरमध्ये पाहायला मिळणार आहे. अभिनेता बेबी जॉनमध्ये चित्रपटामध्ये ही दिसणार आहे. ऍटलीच्या या सिनेमाबद्दल सोशल मीडियावर बरीच चर्चा सुरू आहे आणि 25 डिसेंबर 2024 रोजी सिनेमागृहांमध्ये रिलीज होणार असल्याचं सांगितले जात आहे. यामध्ये अनेक स्टारकास्ट असून, वरूनसोबत पहिल्यांदाच जॅकी श्रॉफ स्क्रीम शेअर करताना दिसणार आहेत.
हे देखील वाचा – सारा अली खान या भाजप नेत्याच्या मुलाला करतेय डेट? अभिनेत्रीचे फोटो झाले व्हायरल!
वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, अभिनेता वरुण धवन अखेरचा श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांच्या ‘स्त्री 2’ चित्रपटात कॅमिओ करताना दिसला होता. या चित्रपटात वरुणने लांडग्याची भूमिका साकारली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला. आणि आता या चित्रपटानंतर अभिनेता पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर झळकणार आहे.
वरून झाला बाबा नुकतेच जाहीर केले लेकीचे नाव
याचदरम्यान वरून धवन आणि त्याची पत्नी नताशा दलाल ३ जून रोजी आई-वडील झाले होते. या जोडप्याने एका सुंदर मुलीचे त्यांच्या आयुष्यात स्वागत केले. आता 5 महिन्यांनंतर, अभिनेत्याने आता त्याच्या मुलीचे नाव जाहीर केले आहे. ‘कौन बनेगा करोडपती’ या शो अभिनेत्याने अमिताभ बच्चन याना सांगतले आहे की त्याने मुलीचे नाव लारा ठेवले आहे. दरम्यान, लारा नावाचा अर्थ आनंद आणि पालक आत्मा आहे.