(फोटो सौजन्य - x अकाउंट)
विकी कौशलच्या ‘छावा’ चित्रपटाबद्दल लोकांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत आहे. पहिल्या आठवड्यानंतरही, लोक चित्रपट पाहण्यासाठी मोठ्या संख्येने थिएटरमध्ये गर्दी करत आहेत. या चित्रपटाने आतापर्यंत जबरदस्त कमाई केली आहे. तसेच या चित्रपटाला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. यादरम्यान चित्रपटाने अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड मोडून आपले अव्वल स्थान निर्माण केले आहे.
पहिल्या आठवड्यातच २०० कोटी कमाई
लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ चित्रपटाने पहिल्या आठवड्यातच मोठी कमाई केली आहे. या चित्रपटाने सात दिवसांत बॉक्स ऑफिसवर ₹२१९.२५ कोटींची कमाई केली आहे. याआधी विकीचा कोणताही चित्रपट इतक्या लवकर २०० कोटींचा टप्पा गाठू शकला नाही. या चित्रपटामुळे अभिनेत्याला चाहत्यांचे भरभरून प्रेम देखील मिळाले आहे. तसेच त्याला चाहत्यांकडून प्रशंसा मिळत आहे.
Rakhi Sawant: हिंदुस्थानी भाऊवर संतापली राखी सावंत; फराह खानला पाठिंबा देत म्हणाली…
विकीच्या कारकिर्दीतील सर्वात यशस्वी चित्रपट
‘छावा’ चित्रपटाने विकीच्या कारकिर्दीला नवीन उंचीवर नेले आहे. या चित्रपटातील त्याच्या अभिनयाचे खूप कौतुक होत आहे. कमाईच्या बाबतीत, हा आता त्याच्या कारकिर्दीतील सर्वात यशस्वी चित्रपट बनला आहे. यापूर्वी हा सन्मान ‘उरी: द सर्जिकल स्ट्राईक’ या चित्रपटाला होता. अभिनेत्याचे प्रत्येक चित्रपट प्रेक्षकांना आवडले आहे. परंतु ‘छावा’ चित्रपटाने आणि अभिनेत्याच्या अभिनयाने लोकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. याचाच आनंद विकी कौशलला होत आहे.
या चित्रपटाने केली एवढी कमाई
नवव्या दिवशी ‘छावा’ चित्रपटाच्या कमाईत शुक्रवारच्या तुलनेत ६३.५ टक्क्यांहून अधिक वाढ झाली. सुरुवातीच्या आकडेवारीनुसार, दुसऱ्या शनिवारी चित्रपटाने ३८.८२ कोटी रुपये कमावले आहेत. रात्री उशिरापर्यंत या आकडेवारीत मोठा बदल दिसून येण्याची शक्यता आहे. यासह, चित्रपटाचे एकूण कलेक्शन आता २८१.५७ कोटी रुपये झाले आहे. तसेच हे आजच्या दिवशी म्हणजेच २३ फेब्रुवारीला वाढण्याची शक्यता आहे. या चित्रपटाने अनेक बॉलिवूड चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले आहेत.
ताऱ्यांच्या गर्दीतील चंद्राचे तेज! ‘चमक असावी तर अशी…’ करिज्माच्या सौंदर्याचा करिष्मा
‘तान्हाजी: द अनसंग वॉरियर’ चित्रपटाला मागे टाकले
‘छावा’ ने अवघ्या नऊ दिवसांत ‘तान्हा: झी द अनसंग वॉरियर’ च्या एकूण कमाईला मागे टाकले आहे. अजय देवगण स्टारर या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर २७९.६० कोटी रुपयांची कमाई केली होती. हा चित्रपट आता ‘पद्मावत’ चित्रपटाच्या कलेक्शनच्या अगदी मागे आहे. २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या संजय लीला भन्साळी यांच्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ३०२.१५ कोटी रुपये कमाई केली होती. आता ‘छावा’ किती कमाई करतो हे पाहणे उत्कंठाचे ठरणार आहे.