(फोटो सौजन्य - Instagram)
पंकज त्रिपाठी पुन्हा एकदा माधव मिश्राच्या भूमिकेत परतत आहेत. कारण जिओ हॉटस्टारच्या ‘क्रिमिनल जस्टिस’ या शोचा चौथा सीझन परत येत आहे. या मालिकेचा ट्रेलर आज प्रदर्शित झाला आहे. यावेळी माधव मिश्रा पुन्हा एकदा एका खुनाचे गूढ उलगडताना दिसणार आहेत. यावेळी, मालिकेत विवाहबाह्य संबंधाचा अँगल देखील जोडण्यात आला आहे. एक खून, दोन आरोपी आणि तीन बाजूंनी खटला दाखवणाऱ्या या मालिकेचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर, चाहते या शोसाठी खूप उत्सुक आहेत.
काय आहे ट्रेलरमध्ये खास ?
दोन मिनिटांच्या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आले आहे की यावेळी माधव मिश्रा यांच्यावर एक हाय प्रोफाइल केस आली आहे. ज्यामध्ये डॉ. राज नागपाल यांच्यावर त्यांच्या प्रेयसीची हत्या केल्याचा आरोप आहे. पतीला वाचवण्यासाठी, राज नागपालची पत्नी अंजू नागपाल प्रसिद्ध वकील माधव मिश्रा यांच्याकडे जाते. तसेच, मग अंजू नागपाल स्वतः आरोपी कशी बनते आणि ती स्वतःसाठी वेगळा वकील कसा शोधते? हे सगळं या मालिकेमध्ये दाखवण्यात येणे येणार आहे.
झीशान अय्युबने केला प्रवेश
झीशान अय्युबने पंकज त्रिपाठीसोबत क्रिमिनल जस्टिसच्या चौथ्या सीझनमध्ये प्रवेश केला आहे. याशिवाय श्वेता बसू प्रसाद, मीता वशिष्ठ, सुरवीन चावला, आशा नेगी, खुशबू अत्रे, बरखा सिंग आणि आत्मा प्रकाश मिश्रा मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. ही मालिका पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत.
‘सितारे जमीन पर’ला का केलं जातंय बॉयकॉट, नेमकं कारण काय ?
ही मालिका २९ मे पासून प्रसारित होणार
रोहन सिप्पी दिग्दर्शित ‘क्रिमिनल जस्टिस’चा चौथा सीझन २९ मे पासून जिओ-हॉटस्टारवर प्रसारित होणार आहे. बीबीसी स्टुडिओज इंडियाच्या सहकार्याने अप्लॉज एंटरटेनमेंटने याची निर्मिती केली आहे. आतापर्यंत क्रिमिनल जस्टिसचे तीन सीझन प्रदर्शित झाले आहेत. अशा परिस्थितीत, आता चौथ्या सीझनबद्दल प्रेक्षकांमध्ये अधिक उत्सुकता आहे.