(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
एका आठवड्यापूर्वी धर्मेंद्र यांना मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयातून दाखल करण्यात आले होते. अभिनेत्याची तब्येत बिघडली होती, परंतु त्यांना डिस्चार्ज मिळाल्यानंतर आता त्यांच्यावर घरी उपचार सुरु आहेत. स्वतःच्या घरात पुन्हा परतून उपचार घेत ते बरे होत होते. परंतु आता पुन्हा अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती बिघडली असल्याचे समोर आले आहे. त्यांच्या घराबाहेर सुरक्षा वाढवली असून आता रुग्णवाहिका देखील उभी आहे. धर्मेंद्र यांच्या तिन्ही मुलींनीही त्यांच्या घरी प्रकृती पाहण्यासाठी पोहचल्या आहेत. धर्मेंद्र यांना भेटण्यासाठी सेलिब्रिटीही त्यांच्या उपस्थित झाले आहेत.
निर्मात्यांनी धर्मेंद्रच्या आवाजात रिलीज केले ‘Ikkis’ चे नवे पोस्टर, चाहत्यांना मिळाले मोठे सरप्राईज
धर्मेंद्र बऱ्याच काळापासून आजारी होते
धर्मेंद्र हे बऱ्याच काळापासून आजारी होते. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. अनेक अभिनेते त्यांना रुग्णालयात भेटायला आता पोहचले आहेत. सलमान खान, शाहरुख खान, गोविंदा आणि अमीषा पटेल सारखे अभिनेते त्यांना भेटायला गेले. धर्मेंद्र यांना ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी ब्रीच कँडी रुग्णालयात नियमित तपासणीसाठी दाखल करण्यात आले. १० नोव्हेंबर रोजी त्यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यांच्यावर दीर्घकाळ रुग्णालयात उपचार सुरू होते आणि त्यानंतर त्यांना घरी नेण्यात आले. धर्मेंद्र यांची पहिली पत्नी प्रकाश यांना त्यांच्या घरीच उपचार करावेत अशी इच्छा होती, म्हणूनच त्यांच्यावर घरीच उपचार केले जात होते, असे वृत्त आहे.
धर्मेंद्र यांची संपूर्ण कारकीर्द
धर्मेंद्र यांनी 1960 मध्ये दिल भी तेरा हम भी तेरे या चित्रपटातून पदार्पण केले होते. त्यानंतर अभिनेता शोला और शबनममध्ये दिसला. धर्मेंद्र यांनी अनपढ , बंदिनी, पूजा के फूल, हकीकत, फूल और पत्थर, अनुपमा, खामोशी, प्यार ही प्यार, तुम हसीन मे जवान, सीता और गीता, लोफर, यादों की बारात आणि शोले यासह अनेक उत्कृष्ट चित्रपटांमध्ये काम केले आहे.
निर्मात्यांनी धर्मेंद्रच्या आवाजात रिलीज केले ‘Ikkis’ चे नवे पोस्टर, चाहत्यांना मिळाले मोठे सरप्राईज
धर्मेंद्र यांनी वयाच्या ८९ व्या वर्षीही काम करत आहेत. त्यांनी अखेरचे तेरी बातों में उल्झा जिया या चित्रपटात जयसिंग अग्निहोत्रीची भूमिका साकारली होती. तसेच ते आता ‘इक्कीस’ या आगामी चित्रपटात दिसणार आहे. इक्कीस हा चित्रपट 25 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. सोमवारी या चित्रपटाचे पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. श्रीराम राघवन दिग्दर्शित, हा चित्रपट एक युद्ध-नाटक आहे, ज्यात अगस्त्य नंदा मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.






