(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
एका सत्य घटनेवर आधारित, “धुरंधर” हा चित्रपट ५ डिसेंबर २०२५ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आणि पहिल्या दिवशी २८ कोटी रुपये या चित्रपटाने कमावले आहे. त्यानंतरही त्याची कमाई कमी झाली नाही. १७ दिवसांत चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरील सर्वात मोठ्या चित्रपटांनाही मागे टाकले. पहिल्या आठवड्यात त्याने २०७.२५ कोटी रुपये कमावले आणि दुसऱ्या आठवड्यात चित्रपटाने २५३.२५ कोटी रुपये कमावले. आता, तिसऱ्या आठवड्यात, त्याच्या कमाईच्या चार्टमध्ये थोडी चढ-उतार पाहायला मिळत आहे. १८ व्या दिवशी सर्वात कमी कमाई झाली, परंतु आता धुरंधरने “कांतारा २” ला मागे टाकले आहे.
‘काश मैं 60 साल…’, वाढदिवसाआधी Salman Khanने व्यक्त केली ‘ही’ इच्छा, फोटो शेअर करत म्हणाला…
रणवीर सिंग, अक्षय खन्ना, संजय दत्त, अर्जुन रामपाल, आर. माधवन आणि सारा अली खान अभिनीत “धुरंधर” हा चित्रपट २८० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवण्यात आला होता. आदित्य धर यांच्या दुसऱ्या दिग्दर्शनातील या चित्रपटाने १७ दिवसांत भारतात ५५५ कोटी रुपये आणि जगभरात ८४७ कोटी रुपये कमावले आहेत. आता १८ व्या दिवसाचे कलेक्शन समोर आले आहेत. चित्रपटाने किती कमाई केली आहे जाणून घेऊयात.
‘धुरंधर’ने १८ व्या दिवशी बॉक्स ऑफिसवर किती कमाई केली?
सॅकनिकच्या मते, ‘धुरंधर’ने १८ व्या दिवशी म्हणजे तिसऱ्या सोमवारी सुमारे १६ कोटी रुपयांची कमाई केली आहे, जे १७ दिवसांतील सर्वात कमी होते. एकूण आता ५७१.७५ कोटी रुपये झाले आहेत, म्हणजेच ६०० कोटी रुपये गाठण्यासाठी थोडे अधिक काम करावे लागणार आहे. २५ डिसेंबर रोजी त्याचा फायदा होण्याची शक्यता आहे. परंतु, कार्तिक आर्यनचा देखील त्यादिवशी चित्रपट प्रदर्शित होणार आहे. आता या दोघांची टक्कर पाहणे मनोरंजक ठरणार आहे.
क्रिती सेननची धाकटी बहीण लवकरच अडकणार लग्नबंधनात! उदयपूरमध्ये पार पडणार लग्न, मुंबईत होणार रिसेप्शन
‘धुरंधर’ने ‘कांतारा: चॅप्टर १’ ला टाकले मागे
‘धुरंधर’ ने ऋषभ शेट्टीच्या ‘कांतारा: अ लेजेंड चॅप्टर १’ च्या जगभरातील ८५२.३१ कोटी रुपयांच्या कलेक्शनला मागे टाकले आहे आणि २०२५ मधील सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट बनला आहे. आता तो रणबीर कपूरच्या ‘अॅनिमल’ ला देखील मागे टाकणार आहे, ज्याने बॉक्स ऑफिसवर जगभरात ९१५ कोटी रुपयांची कमाई केली होती. परंतु, जर आपण दोघांच्या १७ व्या दिवसाच्या कलेक्शनवर नजर टाकली तर, त्यात लक्षणीय फरक आहे. संदीप रेड्डीच्या चित्रपटाने १४.५ कोटी रुपये कमावले, तर आदित्य धरच्या चित्रपटाने ३८.५ कोटी रुपये कमावले. यावरून असे दिसून येत आहे की ‘अॅनिमल’ या कमाईत पुढे आहे.






