(फोटो सौजन्य-Social Media)
ओडिशा संगीत उद्योगातून एक हृदयद्रावक बातमी समोर आली आहे. 15 दिवसांपूर्वी शूटिंगदरम्यान सेटवर ज्यूस पिऊन आजारी पडलेल्या गायिका रुक्साना बानोचे निधन झाले आहे. ती 27 वर्षांची होती. पश्चिम ओडिशातील एका प्रतिस्पर्धी गायकाने विष प्राशन केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. एनडीटीव्हीच्या रिपोर्टनुसार, रुक्साना बानो ही ओडिशातील संबलपुरीची रहिवासी होती. ती एक प्रसिद्ध गायिका होती. भुवनेश्वरच्या एम्समध्ये उपचारादरम्यान या गायिकेने अखेरचा श्वास घेतला. रुक्साना यांच्यावर स्क्रब टायफस (उच्च ताप) या आजारावर उपचार सुरू होते, मात्र बुधवारी रात्री तिचा मृत्यू झाल्याचे रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप समोर आलेले नाही.
रुक्सानाला धमक्या आल्या होत्या, आई आणि बहिणीने केला खुलासा
दुसरीकडे, रुक्सानाच्या आई आणि बहिणीने आरोप केला आहे की, पश्चिम ओडिशातील एका स्पर्धक गायिकेने त्यांना विष प्राशन केले आहे. मात्र, त्यांनी कलाकाराची ओळख उघड केलेली नाही. तसेच, रुक्सानाला यापूर्वीही धमक्या आल्याचा दावा त्यांच्या कुटूंबाने केला आहे. याचदरम्यान आता या धमक्यांचा आणि रुक्सानाच्या मृत्यूचा काही संबंध आहे का? हे अद्यापही स्पष्ट झाले नाही आहे.
हे देखील वाचा- आदिती राव हैदरी आणि सिद्धार्थ लग्नानंतर मुंबईत झाले स्पॉट, दोघेही दिसले रोमँटिक अंदाजात!
३ हॉस्पिटलमध्ये सुरु होते उपचार
रुक्सानाची बहीण रुबी बानो यांनी मीडियाला सांगितले की, ‘प्रारंभिक उपचारानंतर रुक्सानाला बोलंगीर येथील भीमा भोई मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यानंतर तिची प्रकृती खालावली, त्यानंतर तिला बारगढ येथील खासगी रुग्णालयात रेफर करण्यात आले. असे असूनही त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने त्यांना एम्स भुवनेश्वरमध्ये आणण्यात आले. एवढे करूनही रुक्सानाला वाचवण्यात डॉक्टरांना यश मिळाले नाही आणि रुक्सानाने जगाचा निरोप घेतला. रुक्सानाच्या आईने आरोप करतानाचा एक व्हिडिओही जारी केला होता, जो सध्या व्हायरल होत आहे.