(फोटो सौजन्य - अकाउंट)
रविवारी कोलकातामधील एका गर्दीच्या बाजारपेठेत दारू पिऊन चित्रपट आणि दूरदर्शन दिग्दर्शक सिद्धांत दास यांनी त्यांची कार वेगाने चालवली आणि लोकांना धडक दिली आहे. या अपघातात एकाचा मृत्यू झाला तर आठ जण गंभीर जखमी झाले आहेत. रविवारी सकाळी ९ वाजता कोलकात्यातील गजबजलेल्या ठाकूरपुकुर परिसरात हा दुर्दैवी अपघात घडला आहे. या बातमीने सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे.
रेखाच्या अदांनी अमिताभ बच्चन झाले घायाळ! सौंदर्यावरुन हालली नाही बीग बींची नजर
सिद्धांत दास यांच्या कारचा अपघात झाला
टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, ३५ वर्षीय सिद्धांत दास हे बकरहाटहून गरियाहाटकडे जात असताना त्यांचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि त्यांनी गाडी थेट फेरीवाले आणि आठवड्याच्या शेवटी किराणा आणि भाजीपाला खरेदी करणाऱ्या पादचाऱ्यांवर आदळली आहे. पार्क केलेल्या स्कूटरला धडकल्यानंतर गाडी शेवटी थांबली. परंतु या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.
पोलिसांनी निर्मात्याला केली अटक
स्थानिकांनी पोलिसांना माहिती दिली आणि दासला त्याच्या गाडीतून ओढून बाहेर काढले आणि पोलिसांनी येऊन अटक करेपर्यंत मारहाण केली. त्याच्या गाडीतून दारूच्या चार बाटल्या जप्त करण्यात आल्या. चित्रपट निर्मात्यासोबत दोन महिला होत्या आणि त्यापैकी एका महिलेला अटक करण्यात आले आहे तर, दुसरी महिला घटनास्थळावरून पळून गेली आहे.
‘जागतिक आरोग्य दिना’निमित्त रकुल प्रीत सिंगने दिला चाहत्यांना सल्ला, म्हणाली – ‘शरीर एकाच ठिकाणी… ‘
सात जण झाले जखमी
रस्ता बांधकामाच्या कामासाठी या परिसराची नाकेबंदी करण्यात आली होती आणि परिसरातील रहिवाशांच्या हलक्या वाहनांनाच या मार्गावरून जाण्याची परवानगी देण्यात आली होती. तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी सांगितले की दासने बॅरिकेड्स तोडून गर्दीच्या बाजारात आपली गाडी वळवली आणि शेवटी थांबला. इतर सात जणांना प्राथमिक उपचार देण्यात आले आणि त्यांच्या जखमांवर उपचार करण्यात आले आणि त्याच दिवशी त्यांना घरी सुखरूप पोहचवण्यात आले. या घटनेमुळे अनेक कार आणि दुचाकींचेही नुकसान झाले.