(फोटो सौजन्य - x अकाउंट)
दिलजीत दोसांझ सध्या त्याच्या आगामी पंजाबी चित्रपट ‘सरदारजी ३’ मुळे चर्चेत आहे. या चित्रपटात त्याने पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिरसोबत काम केल्यामुळे त्याला नेटकऱ्यांकडून बरीच टीका सहन करावी लागत आहे. या संदर्भात, प्रसिद्ध गायक-संगीतकार गुरु रंधावा यांनीही टिप्पणी केली की हे एखाद्या जनसंपर्काने रचलेले पीआर स्टंट असल्याची शक्यता आहे. तसेच आता गायक आणखी काय म्हणाला आहे हे आपण जाणून घेणार.
हे सगळं पीआर स्टंट आहे का?
सध्या अभिनेता दिलजीत दोसांझ ‘सरदार जी ३’ साठी खूप अडचणींचा सामना करत आहे. आता प्रसिद्ध गायक गुरु रंधावा यांनी कोणाचेही नाव न घेता या प्रकरणावर भाष्य केले आहे. त्यांनी त्यांच्या एक्स अकाउंटवर ट्विट करत लिहिले आहे की, ‘जेव्हा पीआर टीम प्रतिभेपेक्षा जास्त प्रतिभावान असते तेव्हा वाद हा दैनंदिन जीवनाचा भाग बनतो. तो दिवस जवळ आला आहे जेव्हा आपले लोक डोळे उघडतील आणि सत्य जाणून घेतील. हाहाहा. दर महिन्याच्या पहिल्या दिवशी बॉम्ब टाकले जातात. खोट्या पीआर आणि कलाकारांवर देवाचे आशीर्वाद असो.’ असे लिहून गायकाने ही पोस्ट शेअर केली आहे.
Lakh pardesi hoyieee
Apna desh nhi bhandi daaJehre mulk da khayie
us da bura nhi mangi daEven if now your citizenship is not indian but you were born here pls remember this.
This country made great artists and we all are proud of it.
Pls be proud of where you were born.…— Guru Randhawa (@GuruOfficial) June 26, 2025
निषेधांना सामोरे जावे लागत आहे
‘सरदारजी ३’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होताच गायक-अभिनेता दिलजीत दोसांझ वादात सापडला आहे. यामध्ये त्याने पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिरसोबत काम केले आहे. यामुळे नेटकरी त्याच्यावर लक्ष केंद्रित केले आहे आणि त्याला ट्रोल करत आहेत. काही जण त्याच्यावर बहिष्काराची मागणीही करत आहेत. हे सगळं घडत आहे कारण भारताने पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी अभिनेत्रींवर बंदी घातली आहे. आणि या चित्रपटामध्ये अभिनेत्री हानिया आमिर मुख्य भूमिकेत दिसत आहे.
अखेर ‘Son Of Sardaar 2’ ची निर्मत्यानी केली घोषणा, नेटकऱ्यांनी आधीच म्हटले ब्लॉकबस्टर
चित्रपट कधी प्रदर्शित होत आहे?
निषेध लक्षात घेता, चित्रपट निर्मात्यांनी ‘सरदारजी ३’ फक्त परदेशात प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला होता. आता तो भारतात प्रदर्शित होणार नाही. हा चित्रपट २७ जून रोजी परदेशात प्रदर्शित होणार आहे. आणि परदेशी प्रेक्षकांना हा चित्रपट पाहता येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर देखील प्रदर्शित झाला ज्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला परंतु भारतीय चाहते हानिया आमिरच्या उपस्थितीमुळे नाराज आहेत.