(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
चित्रपटप्रेमी सहसा मोठ्या पडद्यावर चित्रपट पाहणे आणि थिएटरमध्ये जाणे पसंत करतात. पण, एक वर्ग असा आहे जो चित्रपटांच्या ओटीटी रिलीजची वाट पाहताना दिसत आहे. अशा लोकांसाठी, ‘हाऊसफुल ५’ च्या ओटीटी रिलीजबद्दल एक अपडेट समोर आले आहे. लोकप्रिय फ्रँचायझीचा हा पाचवा भाग सध्या थिएटरमध्ये सुरू आहे. तसेच या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
या ओटीटीचे राइट्स आहेत
तरुण मनसुखानी दिग्दर्शित साजिद नाडियाडवालाचा ‘हाऊसफुल ५’ हा चित्रपट ६ जून रोजी प्रदर्शित झाला आहे. तो बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत आहे. आता त्याच्या ओटीटी रिलीजबद्दलही चर्चा सुरू आहेत. तेलुगू १२३ च्या वृत्तानुसार, हा चित्रपट लवकरच ओटीटीवर येऊ शकतो. अहवालात असे म्हटले आहे की अमेझॉन प्राइम व्हिडिओने चित्रपटाचे डिजिटल स्ट्रीमिंग राइट्स विकत घेतले आहेत.
कपिल शर्माने ‘Sitaare Zameen Par’च्या कलाकारांना दिले सरप्राईज, व्हिडिओ पाहून चाहते भावुक!
जुलैमध्ये प्रदर्शित होऊ शकेल
या चित्रपटाचा ओटीटी प्रीमियर या वर्षी ऑगस्टमध्ये होणार होता. पण आता असे म्हटले जात आहे की जुलैच्या पहिल्या आठवड्यातच चित्रपटाचे ओटीटी स्ट्रीमिंग सुरू होऊ शकते. बॉक्स ऑफिसवर मिळणाऱ्या प्रतिसादानंतर ‘हाऊसफुल ५’ च्या डिजिटल रिलीजमध्ये अचानक बदल झाल्याचे वृत्त आहे. ‘हाऊसफुल ५’ चित्रपट हा नुकताच ६ जूनला प्रदर्शित झाला, आणि चाहत्यांचा त्याला चांगला प्रतिसाद मिळताना दिसला आहे.
ओटीटी रिलीज लवकर करण्याचा निर्णय का घेण्यात आला?
खरं तर, चित्रपटाकडून खूप अपेक्षा होत्या. पण हा चित्रपट प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करत असल्याचे दिसत नाही. अशा परिस्थितीत, निर्मात्यांनी त्याचे डिजिटल रिलीज थोडे लवकर करण्याचा निर्णय घेतला आहे. तथापि, निर्मात्यांनी किंवा प्राइम व्हिडिओने ओटीटी रिलीजबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी केलेली नाही.
‘बिग बॉस ओटीटी ३’ विजेती Sana Makbul रुग्णालयात दाखल, नेमकं अभिनेत्रीला काय झालं ?
हा चित्रपट २० कलाकारांनी भरलेला आहे. चित्रपटातील स्टार्सबद्दल बोलायचे झाले तर, या चित्रपटात २० स्टार्स आहेत ज्यात अक्षय कुमार, अभिषेक बच्चन, रितेश देशमुख, जॅकलिन फर्नांडिस, सोनम बाजवा, नर्गिस फाखरी, संजय दत्त, जॅकी श्रॉफ आणि नाना पाटेकर यांचा समावेश आहे. पहिल्या दिवशी चित्रपटाने २४ कोटी रुपये कमावले आहे. तर दुसरीकडे, काल शनिवारी चित्रपटाने ३१ कोटी रुपये कमाई केली आहे. चित्रपटाचे बजेट सुमारे २४० कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. बजेटनुसार ही कमाई सरासरी मानली जात आहे.