(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
बॉलिवूडमध्ये सध्या अभिनेत्यांच्या वाढत्या खर्चांबाबत मोठी चर्चा सुरु आहे. अनेक दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे. आता या वादात करण जोहरसारखा मोठा फिल्ममेकर देखील उतरला आहे. बॉलिवूडमध्ये सध्या १०० ते २०० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये चित्रपट तयार होणं काही नवीन राहिलं नाही. मात्र, या प्रचंड खर्चामधील मोठा वाटा कलाकारांच्या भरमसाठ फी आणि त्यांच्या नखऱ्यांवर खर्च होतो, असा थेट आरोप दिग्दर्शक करण जोहर याने केला आहे.
करण जोहरने अनेक स्टार किड्सना बॉलिवूडमध्ये लॉंच केले आहे, जसे की आलिया भट्ट, वरुण धवन आणि सिद्धार्थ मल्होत्रा. तो नेहमीच ‘स्टार किड्स’ना लॉन्च करण्याच्या भूमिकेमुळे चर्चेत असतो आणि या कारणाने त्याला ‘नेपोटिझम’चा टॅग देखील मिळाला आहे. पण, त्याच्या स्वत:च्या मुलांनी अभिनय क्षेत्रात येऊ नये, अशी करण जोहरची इच्छा आहे.
‘तू मरणार आहेस…?’ सैफ अली खानने म्हटले असं काही… काजोलने भावुक होऊन मारली मिठी
करणने नुकतीच फिल्म ट्रेड अॅनालिस्ट कोमल नहाटा यांच्या यूट्यूब चॅनेलवरील मुलाखतीत हा विषय मांडला आणि सर्व निर्मात्यांना एकत्र येण्याचं आवाहन केलं. या मुलाखतीत त्याने मुलांच्या करिअरवर भाष्य केलं. करण जोहरला एक मुलगा व एक मुलगी आहे. रूही आणि यश असं करणच्या मुलांचं नाव आहे. करणला त्यांना अभिनेता बनवायचे नाही. मुलांच्या भविष्यातील करिअरबद्दल बोलताना करणने आपले मत अगदी स्पष्टपणे मांडले. तो म्हणाला, “मला त्यांनी मेकअप किंवा हेअर आर्टिस्ट बनवायचे आहे. कारण ते इतरांपेक्षा जास्त कमाई करत आहेत. एक केस बनवणे आणि दुसरा मेकअप करणे दोघांसाठीही खूप फायदेशीर ठरेल”.
मुलगी झाली हो! अरबाज खान आणि शूरा खानने दिली आनंदाची बातमी, खान कुटुंबात नव्या सदस्याची एन्ट्री
बॉलिवूडमध्ये आपल्या हटके चित्रपटांसाठी आणि स्पष्ट मतांसाठी ओळखला जाणारा दिग्दर्शक-निर्माता करण जोहर केवळ फिल्ममेकिंगपुरता मर्यादित नाही, तर तो एक काळजीवाहू आणि प्रेमळ वडील सुद्धा आहे.सात वर्षांपूर्वी करणने सरोगसीच्या माध्यमातून जुळ्या मुलांचा वडील झाला. करण आणि त्याची आई हिरी जोहर दोघेही या मुलांचा मोठ्या आनंदाने सांभाळ करतात. करण जोहरन नेहमीच आपल्या मुलांसबोतचे फोटो, व्हिडीओ इन्स्टाग्रावर शेअर करत असतो.