(फोटो सौजन्य - अकाउंट)
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार, आर. माधवन आणि अनन्या पांडे यांचा ‘केसरी चॅप्टर २’ हा चित्रपट १८ एप्रिल रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट जालियनवाला बाग हत्याकांडावर आधारित आहे, ज्यामध्ये अक्षय कुमारने प्रसिद्ध वकील शंकरन नायरची भूमिका साकारली होती. निर्मात्यांनी कालच चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग सुरू केले आहे, ज्यामध्ये चांगली कमाई दिसून येत आहे. ‘केसरी चॅप्टर २’ ने रिलीज होण्यापूर्वी ॲडव्हान्स बुकिंगमध्ये किती कमाई झाली आहे हे आपण जाणून घेणार आहोत.
गौरी खानच्या रेस्टॉरंटमध्ये मिळाले ‘बनावट’ पनीर, इन्फ्लूएन्सरचा खळबळजनक आरोप!
‘केसरी चॅप्टर २’ चे ॲडव्हान्स बुकिंग
अक्षय कुमारच्या ‘केसरी चॅप्टर २’ चित्रपटाला रिलीज होण्यापूर्वीच सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. सॅकनिल्कच्या अहवालानुसार, आतापर्यंत आगाऊ बुकिंग करून ३,५०३ शोसाठी २४,४९६ तिकिटे विकली गेली आहेत. या चित्रपटाने ८१ लाख रुपयांपेक्षा जास्त कमाई केली आहे. ब्लॉक सीट्ससह प्रदर्शित होण्यापूर्वीच, त्याने १.८५ कोटी रुपये कमावले आहेत. एकंदरीत, ‘केसरी चॅप्टर २’ च्या आगाऊ बुकिंगची सुरुवात मंदावली आहे, ज्यामुळे असा अंदाज लावला जात आहे की पहिल्या दिवशी चित्रपटाला बरा प्रतिसाद मिळेल.
आर. माधवन दिसणार जबरदस्त भूमिकेत
‘केसरी चॅप्टर २’ मध्ये, अक्षय कुमारने भारतातील प्रसिद्ध वकील सी. शंकरन नायर यांची भूमिका साकारली आहे, तर आर. माधवन वकील नेव्हिल मॅककिन्ले यांची भूमिका साकारत आहेत. जालियनवाला बागेतील हत्याकांडानंतर सी. शंकरन नायर यांनी न्यायालयात ब्रिटिश राजवटीविरुद्ध आवाज उठवला होता. याशिवाय, अनन्या पांडे देखील चित्रपटात एका महत्त्वाच्या भूमिकेत आहे, जिने दिलरीत गिलची भूमिका साकारली आहे.
‘या’ साऊथ अभिनेत्याने आमिर खानच्या चित्रपटातून केले बॉलिवूडमध्ये पदार्पण; आज करोडों संपत्तीचा मालक!
अक्षय कुमारने चित्रपटाबद्दल मांडले मत
दिल्लीत ‘केसरी चॅप्टर २’ च्या विशेष प्रदर्शनात बोलताना अक्षय कुमार म्हणाला की जेव्हा त्याने चित्रपटाची पटकथा वाचली तेव्हा त्याला जालियनवाला बाग हत्याकांडाबद्दल मर्यादित माहिती होती. तो म्हणाला, ‘त्या हत्याकांडानंतर काय घडले हे आपल्या इतिहासाच्या पुस्तकांमध्ये कधीच शिकवले गेले नाही. मला फक्त अशी आशा आहे की ब्रिटिश सरकार चित्रपट पाहेल आणि जी चूक झाली ते स्वीकारेल.’ असं तो म्हणाला. ‘केसरी चॅप्टर २’ हा चित्रपट रघु पलट आणि पुष्पा पलट यांच्या ‘द केस दॅट शूक द एम्पायर’ या पुस्तकावर आधारित आहे.