(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि ‘बिग बॉस मराठी’ च्या पाचव्या पर्वातील सुप्रसिद्ध ‘कोकण हार्टेड गर्ल’ म्हणजे अंकिता वालावलकरने सध्या चर्चेत आहे. तिने ‘बिग बॉस मराठी’च्या घरातून बाहेर पडल्यानंतर १६ फेब्रुवारी २०२५ ला लग्न केले. अंकिताचे लग्न संगीत दिग्दर्शक कुणाल भगतसोबत झाले. बिग बॉसच्या घरामध्ये अंकिताने एन्ट्री घेतल्यानंतर काही दिवसांतच तिने रिलेशनमध्ये असल्याची घोषणा केली होती. आणि तिने बाहेर आल्यानंतर एका व्हिडिओमध्ये सांगितले होते की, ती लवकरच तिच्या पार्टनरसोबत फोटो शेअर करणार आहे. आणि शेवटी चाहत्यांना सांगून टाकले की तिचा पार्टनर कुणाल भगत आहे. या दोघांना पाहून प्रेक्षकांना खूप आनंद झाला आणि त्यांनी शुभेच्छा देखील दिल्या.
आज अंकिता वालावलकरचा पती कुणाल भगतचा वाढदिवस आहे. आणि याच खास निमित्ताने सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरने संगीत दिग्दर्शकाला खास अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत. तिने स्वतःच्या इंस्टाग्राम अकाउंटवर त्या दोघांचे अनेक नवनवीन फोटो शेअर करून लांबलचक नोट देखील लिहिली आहे. ही पोस्ट पाहून चाहते आता कुणाल वर शुभेच्छाचा वर्षाव करत आहेत. तसेच या पोस्टला त्यांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे.
पहलगाम हल्ल्यानंतर Vaani Kapoor का झाली ट्रोल? सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी केली टीका!
अंकिताने शेअर केली पोस्ट
अंकिताने कुणालला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना खूप सुंदर नोट लिहिले आहे. आणि त्याच्या सोबतचे अविस्मरणीय क्षण शेअर करतानाचे फोटो देखील तिने शेअर केले आहेत. तसेच तिने शुभेच्छा देताना लिहिले की, ‘प्रिय कुणाल, आज तुझा वाढदिवस..आपण दोघेही सेलिब्रेशन च्या बाबतीत तसे अरसिक आहोत पण आजचा दिवस तुझ्यापेक्षा जास्त माझ्यासाठी महत्वाचा आहे. आजच्या दिवशी एका घरात एक “मुन्ना” जन्माला आला आणि त्याने २ महिन्यापूर्वी एका वाट चुकलेल्या सैरभैर मुलीला तिच्या आयुष्यात स्थिरता मिळवून दिली. अंकिता अशी वागते हे जगाला दिसायचं पण ती का राहते ते तु शोधलस…तुझ्या असण्याने मला कामाची अजुन ऊर्जा मिळत राहते…का जगाव ह्यापेक्षा आयुष्य किती येक नंबर आहे हे तु दाखवलंस… तुझ्या म्हणण्याप्रमाणे वाढदिवस म्हणजे आपण मागच वर्ष किती भारी जगलो ह्याच celebration असल पाहिजे…मागच्या वाढदिवसाला लग्नासाठी नाही म्हणणारी मी ह्या वाढदिवसाला तुझी बायको आहे. अजुन भारी काय असू शकत.’ असं तिने लिहिले आहेत.
“अनेक प्रश्न! कोणी द्याल का उत्तर?” पहलगाम हल्ल्याप्रकरणावर केतकी माटेगावकरची पोस्ट व्हायरल
तसेच, तिने पुढे लिहिले की, ‘मी हे म्हणणार नाही की देव तुझ्या सगळ्या इच्छा पुर्ण करो… मी हे म्हणेन की स्वामी मला एवढी ताकद देवोत की मी तुझ्या सगळ्या इच्छा पुर्ण करेन… तुला जन्मदिवसाच्या झापुक झुपूक शुभेच्छा! खुप काम कर, खुप मोठा हो. मी काय स्टुडिओत चटई टाकुन झोपेन.’ असं तिने मजेदार नोट लिहून चाहत्यांना चकित करून टाकले आहे.
चाहत्यांसह अनेक कलाकारांनी दिल्या शुभेच्छा
कुणालला आता चाहत्यांसह अनेक मराठी कलाकार देखील वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना दिसत आहेत. तसेच, कुणालबद्दल सांगायचे झाले तर, त्याने अनेक मराठी मालिकांच्या शीर्षक गीतांसह, गाणी आणि चित्रपटांचं संगीत दिग्दर्शन केले आहे. आणि त्याने मराठी सिनेविश्वातील लोकप्रिय संगीतकार म्हणून वेगळे स्थान निर्माण केले आहे. ‘येक नंबर’ या मराठी चित्रपटाची संगीत दिग्दर्शन म्हणून जबाबदारी संभाळली होती.