(फोटो सौजन्य - x अकाउंट)
साऊथ स्टार धनुषचा पुढचा पडद्यावरचा चित्रपट ‘कुबेरा’ हा असणार आहे. हा चित्रपट शेखर कम्मुला दिग्दर्शित करत आहे. धनुष व्यतिरिक्त, टॉलीवूडचा किंग नागार्जुन देखील या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे. आतापर्यंत प्रदर्शित झालेले पोस्टर्स आणि फर्स्ट लूक पाहून प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. तसेच या चित्रपटाची रिलीज डेट देखील समोर आली आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
‘रॉटरडॅम’मध्ये गौरवलेल्या ‘फॉलोअर’ चित्रपटाचा टीजर लाँच, तरुणाच्या वैचारिक संघर्षाची उलघडणार गोष्ट!
कुबेरा कधी होणार रिलीज?
धनुषचे चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत आणि आता प्रदर्शनाची तारीख देखील जाहीर झाली आहे, धनुष आणि नागार्जुनच्या चाहत्यांना वाट पाहण्यासाठी फक्त काही महिने उरले आहेत. ताज्या माहितीनुसार, कुबेर हा चित्रपट २० जून २०२५ रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये अनेक भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. ‘कुबेरा’ हा चित्रपट धारावीच्या पार्श्वभूमीवर बेतलेला आहे आणि एका माणसाच्या गरिबीतून श्रीमंतीकडे जाण्याची कहाणी दर्शवितो आहे.
A story of power..👑
A battle for wealth..💰
A game of fate..♟️#SekharKammulasKuberaa is ready to deliver an enchanting theatrical experience from 𝟐𝟎𝐭𝐡 𝐉𝐮𝐧𝐞, 𝟐𝟎𝟐𝟓. pic.twitter.com/EuH5cEppYr — Kubera Movie (@KuberaTheMovie) February 27, 2025
एक्स अकाउंटवर दिलेल्या रिलीज तारखेची माहिती
कुबेरा चित्रपटाच्या टीमने सोशल मीडियावर माहिती दिली आहे आणि चित्रपटाचे पोस्टर रिलीज केले आहे, ज्यामध्ये धनुष आणि नागार्जुन एकमेकांकडे पाहत आहेत. या पोस्टरसोबत लिहिले आहे की, “सत्तेची कहाणी, पैशासाठी लढाई, नशिबाचा खेळ. शेखर कम्मुलाचा ‘कुबेरा’ २० जून २०२५ पासून एक रोमांचक अनुभव देण्यासाठी सज्ज आहेत.” असे लिहून ही पोस्ट करण्यात आली आहे.
पोस्टरचा फर्स्ट लूक
रिलीज डेट पोस्टरमध्ये धनुष, नागार्जुन आणि बॉलिवूड अभिनेता जिम सर्भ देखील दिसणार आहे. हा चित्रपट धारावी झोपडपट्टी पार्श्वभूमीवर आहे. या चित्रपटात धनुष आणि नागार्जुन व्यतिरिक्त रश्मिका मंदान्ना देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. श्री वेंकटेश्वर सिनेमा एलएलपी आणि अमिगोस क्रिएशन्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या बॅनरखाली सुनील नारंग आणि पुष्कर राम मोहन राव ‘कुबेर’ची निर्मिती करत आहेत. देवी श्री प्रसाद हे चित्रपटाचे संगीत दिग्दर्शक आहेत. हा चित्रपट येत्या २० जून २०२५ रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.