(फोटो सौजन्य- सोशल मीडिया
चित्रपट निर्माता संजय लीला भन्साळी यांचा नवीन चित्रपट ‘लव्ह अँड वॉर’ ची घोषणा करण्यात आली आहे. या चित्रपटबाबत वेगवेगळे उपडेट समोर येत आहे. संजय लीला भन्साळी यांचा लव्ह अँड वॉर हा नवीन चित्रपट जाहीर झाल्यापासूनच चर्चेत आहे. या चित्रपटात रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि विकी कौशल यांची जोडी पाहायला मिळणार आहे. चित्रपटाची कथा लव्ह ट्रँगल असणार आहे. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच प्रेक्षकांच्या मनात या चित्रपटाची खास क्रेझ सुरु झाली आहे. अलीकडेच बातम्या येत होत्या की भन्साळीचा लव्ह अँड वॉर हा राज कपूर, राजेंद्र कुमार आणि वैजयंती माला स्टारर चित्रपट संगमचा रिमेक आहे. जो 1964 मध्ये प्रदर्शित झाला होता. आता भन्साळींनी या सर्व अफवांना पूर्णविराम दिला आहे. आणि या चित्रपटाबाबत मोठा उपडेट दिले आहे.
भन्साळींनी ‘लव्ह अँड वॉर’ला खास चित्रपट म्हटले आहे
हॉलिवूड रिपोर्टर इंडियाशी बोलताना संजय लीला भन्साळी म्हणाले, “लव्ह अँड वॉर हा कोणत्याही चित्रपटाचा रिमेक नाही. तुम्ही शोले किंवा मदर इंडियाचा रिमेक करू शकत नाही, मग मी संगमचा रिमेक का करू? हा खूप खास चित्रपट आहे.” असे ते म्हणाले.
रणबीरसोबत १८ वर्षांनंतर काम करणार दिग्दर्शक
त्यांनी सांगितले की इतर चित्रपटांप्रमाणे या चित्रपटात मोठे भव्य सेट किंवा वेशभूषा इत्यादी असणार नाहीत. तसेच, ते पुढे म्हणाले “हा एक अतिशय खास चित्रपट आहे कारण हा कोणत्याही ऐतिहासिक काळातील चित्रपट नाही. त्यात ना मोठे खांब, ना पोशाख, ना घोडे असे काही नसणार नाही आहे, हे खूप वेगळे आहे, या चित्रपटामधील संगीतही वेगळे असणार आहे. मला चित्रपट बनवताना मजा येत आहे. ‘ असे त्यांनी सांगितले. आणि पुढे रणबीरबद्दल सांगताना ते म्हणाले की, तो 18 वर्षांनी माझ्यासोबत काम करणार आहे यासाठी मी खूप उत्सुक आहे.
हे देखील वाचा- ‘सिंघम अगेन’ नंतर आता ‘भूल भुलैया 3’चा डंका, कॉमेडीने भरलेल्या चित्रपटाचा ट्रेलर या दिवशी होणार रिलीज!
‘लव्ह अँड वॉर’ हा त्यांच्यासाठी कठीण चित्रपट असल्याने या चित्रपटाचे शूट खूप सावकाश आणि काळजीपूर्वक बनवणार असल्याचे भन्साळी यांनी सांगितले. हा चित्रपट 20 मार्च 2026 रोजी चित्रपगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामधील रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि विकी कौशल यांची केमिस्ट्री पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे.