फोटो सौजन्य - सोशल मीडिया
बॉक्स ऑफिसवर रोहित शेट्टी दिग्दर्शित सिंघम अगेन सिनेमा कमाल करत आहे. ‘सिंघम अगेन’ दिवाळीला म्हणजेच १ नोव्हेंबरला चित्रपट गृहांमध्ये दाखल झाला आहे. रोहितच्या या कॉप युनिव्हर्स चित्रपटात प्रत्येक वेळी प्रमाणेच या वेळी देखील स्टार्सकास्ट मोठी आहे. सिनेमामध्ये अनेक मोठ्या बॉलीवूड नावांचा समावेश आहे. या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासून प्रेक्षक त्याच्या रिलीजची आतुरतेने वाट पाहत होते. अजय देवगण स्टारर कॉप युनिव्हर्स सिंघमच्या तिसऱ्या हप्त्याने म्हणजेच ‘सिंघम अगेन’ने सुरुवातीला बंपर कमाई केली होती, परंतु अवघ्या दोन आठवड्यांत तो बॉक्स ऑफिसवर मागे पडल्याचे दिसत आहे. दरम्यान, या चित्रपटाचे शनिवारचे कलेक्शन आता समोर आले आहे. बघूया या चित्रपटाने आतापर्यंत किती कमाई केली आहे.
‘भूल भुलैया 3’ आणि ‘सिंघम अगेन’ 1 नोव्हेंबरला पडद्यावर आले आणि आता दोन्ही चित्रपट प्रदर्शित होऊन 16 दिवस झाले आहेत. रिलीज झाल्यापासून, कधी अजय देवगणच्या ‘भूल भुलैया 3’ या चित्रपटाला तर कधी कार्तिकच्या ‘सिंघम अगेन’ चित्रपटाला मागे टाकत असल्याचे दिसते.
मनोरंजन संबंधित बातमी वाचण्यासाठी इथे क्लिक करा
१ नोव्हेंबर रोजी बॉक्स ऑफिसवर रोहित शेट्टीच्या ‘सिंघम अगेन’मध्ये सिम्बाचा सामना ‘भूल भुलैया 3’चा होता. दोघांमध्ये जोरदार शर्यत पाहायला मिळाली. त्याचवेळी आता ‘द साबरमती रिपोर्ट’ आणि ‘कांगुवा’ हे चित्रपट रिलीज झाले आहेत. ‘सिंघम अगेन’मध्ये अजय देवगणसोबत रणवीर सिंग, अक्षय कुमार, करीना कपूर खान, दीपिका पदुकोण, अर्जुन कपूर, टायगर श्रॉफ आणि जॅकी श्रॉफ यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाने पहिल्या दिवशी 43.5 कोटींची कमाई केली होती. आता जर आपण शनिवारच्या कमाईवर नजर टाकली तर सॅकनिल्कच्या सुरुवातीच्या अहवालानुसार, अजय देवगणच्या चित्रपटाने 16 व्या दिवशी 3.25 कोटी रुपये कमवले. या स्थितीत चित्रपटाचे एकूण कलेक्शन 226.5 कोटी रुपये झाले आहे. त्याच वेळी, भूल भुलैयाने बुधवारी 4.00 कोटी रुपयांचे मोठे कलेक्शन केले.
कार्तिक आर्यनच्या ‘भूल भुलैया 3’ने पहिल्या आठवड्यात 158.25 कोटींची कमाई केली आहे. दुसऱ्या आठवड्यात चित्रपटाचे कलेक्शन 58 कोटी होते. तिसऱ्या शुक्रवारी कार्तिक आर्यनच्या चित्रपटाने 4.15 कोटींची कमाई केली होती. आता तिसऱ्या शनिवारी या चित्रपटाने 4.75 कोटींची कमाई केली आहे. आता ‘भूल भुलैया 3’ ने 16 दिवसांत एकूण 225.15 कोटींची कमाई केली आहे आणि ‘सिंघम अगेन’च्या कलेक्शनच्या अगदी जवळ आला आहे.
आजकाल अनेक चित्रपट पडद्यावर आहेत. ‘भूल भुलैया 3’ आणि ‘सिंघम अगेन’ नंतर, 14 नोव्हेंबरला सुर्याचा ॲक्शन-फँटसी चित्रपट ‘कंगुवा’ रिलीज झाला. विक्रांत मॅसीचा ‘द साबरमती रिपोर्ट’ हा चित्रपटही 15 नोव्हेंबरला प्रदर्शित झाला. असे असूनही ‘भूल भुलैया 3’ आणि ‘सिंघम अगेन’ दररोज करोडोंचा व्यवसाय करत आहेत.