(फोटो सौजन्य-Instagram)
बॉलिवूड अभिनेत्री मृणाल ठाकूरला लव्ह सोनिया या चित्रपटातून प्रसिद्धी मिळाली. अभिनेत्रीने सुपर ३०, बाटला हाउस, तुफान, जर्सी, सीता रामम आणि द फॅमिली स्टार यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. आता अलीकडेच, अभिनेत्रीची एक जुनी मुलाखत व्हायरल होत आहे ज्यामध्ये तिने भारतीय क्रिकेटर विराट कोहलीबद्दल वक्तव्य केले होते. या मुलाखतीत अभिनेत्रीने खुलासा केला होता की, एकेकाळी विराट कोहली तिचा क्रश असायचा. मृणालचे हे जुने विधान एका सोशल मीडिया हँडलने शेअर केले होते, त्यानंतर ते रेडिट आणि इतर सोशल मीडिया अकाउंटवर वेगाने व्हायरल होऊ लागले. यावर आता अभिनेत्री मृणाल ठाकूरने नाराजी व्यक्त केली आहे. आणि नेटकऱ्यांना ‘थांबा आता’ असा संदेश दिला आहे.
अभिनेत्रीने केली टिप्पणी
हिंदुस्तान टाईम्सच्या रिपोर्टनुसार, इन्स्टंट बॉलिवूडने पोस्ट केलेल्या पोस्टमध्ये मृणाल ठाकूरच्या फोटोसोबत विराट कोहलीच्या फोटोचा कटआउट होता. या पोस्टवर मृणालनेही कमेंट केली आहे. अभिनेत्रीने लिहिले की, ‘बस करा आता ठीके.’ अशी कंमेंट करून अभिनेत्रीने चाहत्यांवर नाराजी व्यक्त केली आहे.
Posts from the bollyblindsngossip
community on Reddit
मृणालचे विधान काय होते
मृणाल तिच्या जर्सी चित्रपटाचे प्रमोशन करत होती. हा चित्रपट क्रिकेटवर आधारित होता. या मुलाखतीत अभिनेत्री म्हणाली होती की, “एक काळ असा होता जेव्हा मी विराट कोहलीच्या प्रेमात वेडी होते. माझ्या भावामुळे मला क्रिकेटमध्ये रस निर्माण झाला कारण तो त्याचा मोठा चाहता आहे. मी त्याच्यासोबत लाइव्ह सामने पाहिले आहेत. स्टेडियममध्ये मला निळ्या रंगाची जर्सी घालून टीम इंडियाचा जयजयकार केल्याचे आठवते, त्यामुळे आज मी क्रिकेटवर आधारित चित्रपटाचा भाग आहे.” असे तिने या मुलाखतीत सांगितले.
हे देखील वाचा- अजय देवगणच्या ‘सन ऑफ सरदार 2’ चे शूटिंग सुरु, सोनाक्षीच्या जागी दिसणार ‘ही’ अभिनेत्री!
अभिनेत्रीचे येणारे चित्रपट
अलीकडेच मृणाल विजय देवरकोंडासोबत फॅमिली स्टारमध्ये दिसली होती. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगलाच प्रतिसाद मिळाला. याशिवाय मृणाल लवकरच अजय देवगणसोबत ‘सन ऑफ सरदार २’ या चित्रपटामध्ये झळकणार आहे. या चित्रपटाचे नुकतेच शूटिंग सुरु झाले असून तो लवकरच प्रदर्शित होणार आहे.