(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
संगीतकार अमाल मलिक याने गेल्या गुरुवारी सोशल मीडिया इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आणि त्याने त्यामध्ये म्हटले की कुटुंबाशी असलेले सर्व संबंध तोडले आहे. आपल्या दीर्घ पोस्टमध्ये, ३४ वर्षीय संगीतकाराने आपल्या पालकांवर अनेक आरोप केले होते आणि म्हटले होते की त्यांच्यामुळे तो त्याचा भाऊ अरमान मलिकपासून दूर झाला आहे. अमालने खुलासा केला की तो क्लिनिकल डिप्रेशनने ग्रस्त आहे आणि त्याचे पालक यासाठी काही प्रमाणात जबाबदार आहेत.
अमाल मलिकच्या आरोपांनंतर दोन दिवसांनी, आता त्याचे वडील डब्बू मलिक यांनी एक पोस्ट शेअर करून आपले मौन सोडले आहे. संगीत दिग्दर्शकाने त्यांचा मोठा मुलगा अमालसोबतचा एक प्रेमळ फोटो शेअर केला आहे. या चित्रात अमाल त्याच्या वडिलांना मिठी मारताना आणि गालावर किस करताना दिसत आहे. हा फोटो पाहून चाहत्यांना खूप आनंद झाला आहे. आणि या पोस्टला भरभरून प्रतिसाद देत आहे.
रीना दत्तासोबत घटस्फोट घेतल्यानंतर आमिर खानची झालेली ‘अशी’अवस्था; म्हणाला, ‘एका दिवसात एक बाटली…’
सोनू निगमने डब्बू मलिकचे सांत्वन केले
शनिवारी आपल्या मुलासोबतचा हा फोटो शेअर करताना डब्बूने फक्त ३ शब्द लिहिले. त्यांनी त्यांच्या फोटोच्या कॅप्शनमध्ये ‘आय लव्ह यू’ असे लिहून हा फोटो शेअर केला आहे. त्याच्या पोस्टवर अनेकांनी कमेंट करून त्याचे सांत्वन केले आहे. ज्येष्ठ गायक सोनू निगम यांनी डब्बू मलिकच्या पोस्टवर कमेंट केली आहे आणि त्यांच्या कठीण काळात त्यांना प्रोत्साहन दिले आहे. सोनू त्याच्या पोस्टमध्ये लिहिले की, ‘सर्व काही ठीक होते, सर्व काही ठीक आहे आणि सर्व काही ठीक होईल’. असे लिहून त्याने या पोस्टला कंमेंट केली आहे.
अमालच्या आईने मौन तोडण्यास स्पष्ट नकार दिला
काही दिवसांपूर्वी, अमाल मलिकची आई ज्योती मलिक हिला तिच्या मुलाच्या कुटुंबाबद्दलच्या धक्कादायक विधानांबद्दल विचारण्यात आले. हिंदुस्तान टाईम्सशी बोलताना त्यांनी उत्तर दिले, “मला वाटत नाही की तुम्ही (मीडियाने) यात सहभागी होण्याची गरज आहे. त्याने जे काही सांगितले आहे ते त्याची निवड आहे. मला माफ करा. धन्यवाद’. असे म्हणून त्यांनी आपले मत मांडले.
गायकाने गोपनीयतेची मागणी केली
कुटुंबाशी असलेले सर्व संबंध तोडल्यानंतर काही वेळातच, अमाल मलिकने आणखी एक पोस्ट शेअर केली आणि सर्वांचे त्यांच्या पाठिंब्याबद्दल आभार मानले. यासोबतच त्याने त्याच्या कुटुंबासाठी गोपनीयतेची मागणी केली होती. गायकाने विनंती केली होती की त्यांच्या पोस्टचा विपर्यास आणि चुकीचा अर्थ लावला जाऊ नये.