(फोटो सौजन्य - x अकाउंट)
रजनीकांत यांचे जवळचे मित्र राजेश विल्यम्स हे देखील एक अनुभवी अभिनेते आणि उद्योगपती होते. त्यांनी शेकडो तमिळ आणि मल्याळम चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये काम केले होते. गुरुवार, २९ मे रोजी चेन्नई येथे त्यांचे निधन झाले. ते ७५ वर्षांचे होते. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत नायक आणि सहाय्यक भूमिकांमध्ये उत्कृष्ट अभिनय केला आहे. त्यांच्या अभिनयाने अनेकांचे मन जिंकले आहे. आता त्यांच्या या बातमीने चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे.
राजेश विल्यम्स यांनी घेतला जगाचा निरोप
डीटी नेक्स्टशी बोलताना त्यांच्या पुतण्याने सांगितले की, राजेश यांना गुरुवारी सकाळी कमी रक्तदाबाचा त्रास सुरु झाला. त्यांना ताबोडतोब रुग्णालयात नेण्यात आले, परंतु वाटेतच त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगी दिव्या आणि मुलगा दीपक आहेत. दीपक यांनी २०१४ मध्ये चित्रपटांमध्ये अभिनय करण्यास सुरुवात केली. राजेश यांची पत्नी जोन सिल्व्हिया वंतिरयार यांचे २०१२ मध्ये निधन झाले.
काजोल करणार राक्षसाशी सामना; ‘Maa’ चित्रपटाचा खतरनाक ट्रेलर रिलीज, पाहून होईल थरकाप
मित्राच्या निधनाबद्दल रजनीकांत यांनी व्यक्त केले दुःख
अभिनेता रजनीकांत यांनी अभिनेता राजेश यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी सोशल मीडियावर लिहिले की त्यांच्या जवळच्या मित्राच्या अचानक निधनाची बातमी ऐकून त्यांना खूप दुःख झाले. गुरुवारी रजनीकांत यांनी त्यांच्या एक्स अकाउंटवर तमिळमध्ये लिहिले की, “माझा मित्र राजेश यांच्या अचानक निधनाची बातमी ऐकून मला मोठा धक्का बसला आहे आणि दुःख झाले आहे. तो खूप चांगला माणूस होता. त्यांच्या आत्म्याला शांती मिळो. त्यांच्या कुटुंबियांना आणि मित्रांना माझ्या मनापासून संवेदना.” राजेश आणि रजनीकांत यांनी ‘थाई वीडू’, ‘बिल्ला’ आणि ‘थानिकट्टू राजा’ सारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे.
என்னுடைய நெருங்கிய நண்பர், நடிகர் ராஜேஷ் அவர்களின் அகால மரணச் செய்தி எனக்கு அதிர்ச்சியளிக்கிறது. மிகுந்த மன வேதனையைத் தருகிறது.
அருமையான மனிதர், அவருடைய ஆத்மா சாந்தியடையட்டும்.
அவருடைய குடும்பத்தினருக்கும், நண்பர்களுக்கும் என்னுடைய ஆழ்ந்த அனுதாபங்கள்.#ActorRajesh
— Rajinikanth (@rajinikanth) May 29, 2025
रेचल गुप्ताने शेअर केला भावुक व्हिडीओ; छळ आणि मानसिक तणावामुळे केला मिस ग्रँड इंटरनॅशनलचा मुकुट परत?
राजेश विल्यम्स यांची कारकीर्द
राजेश त्यांचा जन्म तिरुवरूरमधील मन्नारगुडी येथे विल्यम्स नटर आणि लिली ग्रेस मानकोंडर यांच्या पोटी झाला. १९७२ ते १९७९ पर्यंत त्यांनी एका हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून काम केले. १९७४ मध्ये त्यांनी अवल ओरु अवल ओरु थोदर कथाई या चित्रपटात एका छोट्या भूमिकेतून चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. १९७९ च्या कन्नी परुवतीले या चित्रपटात त्यांना पहिला नायक म्हणून भूमिका मिळाली.
त्यांनी १९८४ च्या प्रसिद्ध चित्रपट ‘अच्छमिल्लई अच्छमिल्लई’ मध्येही काम केले, जो के. बालचंदर दिग्दर्शित होता. याशिवाय राजेश यांनी मायक्रो थोडारगल-अझुक्कु वेट्टी आणि अलीकडेच कार्तिगाई दीपम या टीव्ही शोमध्येही काम केले. ते शेवटचे विजय सेतुपती आणि कतरिना कैफ यांच्या ‘मेरी क्रिसमस’ या चित्रपटात ‘यधूम अंकल’च्या भूमिकेत दिसले होते. चित्रपटांव्यतिरिक्त, राजेश हॉटेल आणि रिअल इस्टेट व्यवसायातही काम करत होते आणि चेन्नईच्या प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकांमध्ये त्यांची गणना होते.