आज सर्वत्र रक्षाबंधन हा सण साजरा केला जात आहे. या सणाला भाऊ बहीण खूप खुश असतात बहीण या दिवशी भावासाठी योग्य मिठाई निवडते आणि भाऊ बहिणीसाठी भेटवस्तूंची यादी तयार करतो. तसेच, आज रक्षाबंधन आहे, हा सण भांडण, आठवणी आणि भाऊ-बहिणीच्या अतूट नात्याबद्दल आहे. याचदरम्यान बॉलीवूडमध्ये हा सॅन मोठ्या प्रमाणात साजरा होताना दिसत आहे. असेच काही चित्रपटांवर नजर टाकुयात ज्या चित्रपटामध्ये भाऊ-बहिणीचे घट्ट नातं पाहायला मिळत आहे.
प्रियांका चोप्रा आणि रणवीर सिंग: दिल धडकने दो
प्रियंका चोप्रा आणि रणवीर सिंग यांनी साकारलेल्या आयशा आणि कबीर मेहरा या अनोख्या आणि सुंदर भूमिकेने सर्व प्रेक्षकांच्या हृदयाला स्पर्श केला आहे. भाऊ-बहिणींचे एकत्र कुटुंबातील गुंतागुंत हाताळली आणि एकमेकांना नेहमीच साथ हे या चित्रपटामध्ये दोघांनीही अत्यंत हुशारीने सादर केले आहे. प्रेक्षकांना या भूमिका प्रचंड आवडल्या आहेत.
कियारा अडवाणी आणि मनीष पॉल: जुग जुग जिओ
कियारा अडवाणी आणि मनीष पॉल यांनी त्यांच्या बाँडने पडद्यावर आग लावली जी कोणत्याही क्षणाला हसण्याच्या दृश्यात बदलते. नयना आणि गुरप्रीत शर्मा, हा नेत्यांनी या चित्रपटामध्ये पात्र साकारलेले होते. या दोघांचा भाव बहिणीचा अभिनय पाहून प्रेक्षकांना हा अभिनय खूप आवडला आणि या दोघांचे कौतुकसुद्धा केले गेले.
ऐश्वर्या राय आणि शाहरुख खान: जोश
जोशमध्ये ऐश्वर्या आणि शाहरुख यांनी भूमिका साकारलेली शर्ली आणि मॅक्स ही त्या जोडीपैकी एक आहे जी मनोरंजन आणि अभिनयासाठी परिपूर्ण आहे. कठीण वातावरणात वाढलेल्या या जुळ्या मुलांनी कथा या चित्रपटामध्ये दाखवण्यात आली आहे. हे दोघंही एकमेकांची काळजी घेताना दिसत आहेत. त्यांचा अभिनय इतका मोहक होता की लोक लगेचच या जोडीच्या प्रेमात पडले.
सिद्धार्थ मल्होत्रा आणि फवाद खान: कपूर आणि सन्स
अर्जुन आणि राहुल कपूर या पत्रामध्ये सिद्धार्थ मल्होत्रा आणि फवाद खान यांची भूमिका अत्यंत कौतुकास्पथ आहे. या चित्रपटामध्ये वयात आल्याची गुंतागुंत आणि भावंडांमधील न बोललेल्या भावनांचे चित्रण केले आहे. भाऊ बहिणीमधील अडचणी, कौटुंबिक वाद आणि कुटूंबातील सुंदर नाते दाखवण्यात आले आहे.
राधिका मदन आणि सान्या मल्होत्रा: पटाखा
राधिका मदन आणि सान्या मल्होत्रा त्यांनी पटाखा मधील त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीसह सर्वोत्कृष्ट बहिणीचा परफॉर्मन्स जिंकला आहे. राधिका आणि सान्या यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री इतकी सुंदर आणि खरी होती की दोघीनींही या बहिणीचे एकमेकांमधील नातं खूप सहजरित्या स्पष्ट होत आहे.
जेनेलिया डिसूझा आणि प्रतीक बब्बर: जाने तू या जाने ना
जाने तू या जाने ना हा चित्रपट सर्व प्रेक्षकांसाठी आवडता आहे. कथेचा मुख्य कथानक मैत्रीचा आहे, पण आदिती आणि अमित यांच्यातील भावा-बहिणीचे नातेही लक्षवेधी आहे. एकमेकांपासून पूर्णपणे भिन्न भूमिकेत असताना नंतर हे दोघेही एकमेकांचा सर्वात मोठा आधार बनतात जेव्हा एकमेकांना त्यांची सर्वात जास्त गरज असते. चित्रपटामधील हीच कथा चाहत्यांना जास्त भावली आहे.