(फोटो सौजन्य- इंस्टाग्राम)
सलमान खान आणि त्याचा पुतण्या अयान अग्निहोत्रीचे नवे गाणे यू आर माईन रिलीज झाले आहे. या गाण्याला सलमानने आपला आवाज दिला आहे तर अयान म्हणजेच अग्नि यात रॅप करताना दिसणार आहे. हे गाणे विशाल मिश्राने संगीतबद्ध केले आहे.
शूटिंग पनवेल फार्म हाऊसमध्ये करण्यात आले
सलमानचा आवाज गाण्याला रोमँटिक ट्विस्ट देताना दिसत आहे तर अग्निच्या रॅपने त्यात आणखी मसाला टाकण्याचा प्रयत्न केला आहे. हैदर खान दिग्दर्शित या गाण्याचे बोल सलमान खान आणि संजीव चतुर्वेदी यांनी संयुक्तपणे लिहिले आहेत. हे संपूर्ण गाणे सलमानच्या पनवेल येथील फार्म हाऊसवर चित्रीत करण्यात आले आहे. हे सुमारे 150 एकरमध्ये पसरलेले असून त्याची किंमत 80 कोटींहून अधिक आहे. हे फार्म हाऊस सलमान खानची बहीण अर्पिताच्या नावावर आहे.
सलमानने अयानचा बालपणीचा फोटो केला शेअर
सलमानने गाणे रिलीज झाल्याची माहिती देण्यासाठी अयानचा लहानपणीचा फोटो शेअर केला आहे. यासोबत त्याने कॅप्शनमध्ये लिहिले – “कालच घडल्यासारखं वाटतंय.. यू आर माईन.. हे गाणं आज संध्याकाळी ५ वाजता रिलीज होणार आहे.. बघत राहा!’ असे लिहून सलमानने ही पोस्ट शेअर केली आहे.
हे देखील वाचा- प्रियांका, आलिया अन् कतरिनाच्या ‘जी ले जरा’ चित्रपटाला का होतोय उशीर? झोया अख्तरने सांगितले कारण!
अयानचे गाणे यापूर्वीही आले आहे
अयान हा सलमान खानची बहीण अलविरा अग्निहोत्री आणि अतुल अग्निहोत्री यांचा मुलगा आहे. अयानची बहीण अलीझेहने गेल्या वर्षी फरे या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. आता अयाननेही एका म्युझिक व्हिडिओद्वारे डेब्यू केला आहे. काही काळापूर्वी अयानचा पार्टी फिव्हर नावाचा म्युझिक व्हिडिओ रिलीज झाला होता. या गाण्यात पायल देवसोबत अयानचा आवाजही ऐकू आला होता. तसेच या गाण्यात सलमानची देखील झलक पाहायला मिळाली आहे.