(फोटो सौजन्य - अकाउंट)
बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान आणि प्रसिद्ध गायक अरिजीत सिंग यांच्यातील वर्षानुवर्षेच्या मतभेदानंतर, आता दोघेही पुन्हा एकत्र आले आहेत. ‘सिकंदर’ चित्रपटाच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘हम आपके बिना’ या नवीन गाण्यात अरिजीतचा आवाज ऐकू आला, ज्यामुळे या दोघांमधील ९ वर्षांचे वैर आता मैत्रीत बदलले आहे हे स्पष्ट झाले आहे. पण दोघांमधील वाद इतका काळ का टिकला आणि तो कसा संपला? हे आपण आता जाणून घेणार आहोत.
२०१४ मध्ये स्टार गिल्ड अवॉर्ड्स दरम्यान हा वाद सुरू झाला. हा शो सलमान खान आणि रितेश देशमुख यांनी होस्ट केला होता आणि याच काळात अरिजीत सिंगला सर्वोत्कृष्ट गायकाचा पुरस्कार मिळाला. जेव्हा अरिजीत स्टेजवर पोहोचला तेव्हा सलमानने गमतीने विचारले- ‘तुम्हाला झोप लागली का?’ यावर अरिजीतने उत्तर दिले- ‘तुमच्या होस्टिंगमुळे माझी झोप उडाली.’ सलमानला हे उत्तर आवडले नाही. तो गमतीने म्हणाला, ‘तुम्ही गाणी गाता त्यामुळे तर मला झोप यते!’. त्यानंतर सलमानने अरिजीतला त्याचे ‘तुम ही हो’ हे हिट गाणे गाण्यास सांगितले. जेव्हा अरिजीतने गाणे सुरू केले तेव्हा सलमानने त्याची नक्कल करून त्याची खिल्ली उडवायला सुरुवात केली. यानंतर दोघांमधील अंतर वाढत गेले. आणि यानंतर अरिजीत आणि सलमान खान यांच्यात वाद झाल्याचे दिसून आहे.
सलमानने ‘सुलतान’मधून अरिजीतचे गाणे काढून टाकले
या वादानंतर २०१६ मध्ये सलमानच्या ‘सुलतान’ चित्रपटात अरिजीतने गायलेले एक गाणे समाविष्ट करण्यात आले. पण वृत्तानुसार, सलमानने स्वतः ते गाणे काढून टाकले आणि नंतर ते राहत फतेह अली खान यांनी गायले. यादरम्यान, अरिजीतने फेसबुकवर सलमानची माफी मागितली, परंतु नंतर ती पोस्ट डिलीट करण्यात आली. अरिजीतने सलमानला माफ करण्यासाठी अनेक वेळा प्रयत्न केले, पण सलमानचा राग शांत झाला नाही आणि दोघांमधील संभाषण थांबले.
पुन्हा प्लॅस्टिक सर्जरी केली का ? मौनी रॉयचा नवा लूक पाहून नेटकरी बुचकळ्यात…
९ वर्षांनंतर वाद संपला
सलमान आणि अरिजीतमधील ही दरी ९ वर्षे चालू राहिली, पण २०२३ मध्ये ‘टायगर ३’ दरम्यान दोघांमध्ये अखेर समेट झाला. या चित्रपटात अरिजीत सिंगने ‘लेके प्रभु का नाम’ आणि ‘रुआन’ सारखी गाणी गायली, जी सुपरहिट ठरली. इतक्या वर्षांनंतर पहिल्यांदाच अरिजीत पुन्हा सलमानसाठी गाणे गाताना दिसला. ‘टायगर ३’ नंतर, सलमान खान आणि रश्मिका मंदाना यांच्या आगामी ‘सिकंदर’ या चित्रपटातही अरिजित सिंगचा आवाज ऐकू येणार आहे. ‘हम आपके बिना’ या चित्रपटातील नवीन गाणे नुकतेच प्रदर्शित झाले आहे आणि त्याला प्रेक्षकांकडून प्रचंड प्रेम मिळत आहे.