(फोटो सौजन्य- इंस्टाग्राम)
बिग बॉस 18′ या रिॲलिटी शोचा प्रोमो काही दिवसांपूर्वीच आला होता. ज्याने चाहत्यांची उत्कंठा वाढवली. पण आता या शोचा आणखी एक प्रोमो रिलीज झाला आहे ज्यामध्ये सलमान खानने या शोच्या ग्रँड प्रीमियरची तारीख जाहीर केली आहे. या प्रोमोमध्ये, सलमान खान फक्त त्याच्या पूर्वीच्या स्वॅगमध्ये परतला नाही तर यावेळी कुटुंबातील सदस्यांसह गर्दी होणार असल्याचेही सांगितले आहे. या दोन्ही प्रोमोनंतर आता कलर्स टीव्हीने या प्रोमोचा BTS व्हिडीओ शेअर केला आहे. जे पाहून बॉलीवूड स्टार सलमान खानने पुन्हा एकदा चाहत्यांची मने जिंकली आहे.
कलर्सने शेअर केला होता ‘बिग बॉस’ चा प्रोमो
या प्रोमोमध्ये सलमान खान म्हणतोय – ‘हा डोळा पाहिला आणि दाखवलाही जाऊ शकतो. पण फक्त आजची परिस्थिती. पण आता असे सह्स्य उघडतील आणि इतिहासाची कथा लिहिली जाईल. उद्या दिसेल. विज्ञानाचा प्रलय होईल, आणि भविष्यकाळाचा डोळा स्वतः उघडेल, त्यातील प्रत्येक कारस्थान दिसेल, उद्या काय घडेल ते सर्व कळेल. यावेळी बिग बॉसमध्ये घरातील सदस्य दिसणार आहेत. त्यामुळे त्यांचे नशीब कोण बदलणार? हे सगळं या प्रोमोमध्ये दिसले आहे.
कलर्सने शेअर केला ‘बिग बॉस’च्या प्रोमो BTS व्हिडीओ
सलमान खानचा लोकप्रिय शो ‘बिग बॉस १८’ लवकरच प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. तसेच या शोचा नुकताच प्रोमो देखील कलर्स टीव्हीने शेअर केला आहे. या प्रोमोला चाहत्यांनी चांगलाच प्रतिसाद दिला आहे. प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया आल्यानंतर लगेचच कलर्स टीव्हीने आता ‘बिग बॉस १८’ प्रोमोचा BTS व्हिडीओ चाहत्यांसाठी शेअर केला आहे. या BTS व्हिडीओ मध्ये सलमानची शूटिंग दरम्यान सुरु असलेली गंमत दिसून येत आहे. हा व्हिडीओ पाहून चाहत्यांना खूप आनंद होत आहे. तसेच त्यांनी या BTS व्हिडीओला देखील चांगला प्रतिसाद दिला आहे. तसेच ‘बिग बॉस’ प्रेमींना आता लवकरच बिग बॉस आणि सलमान खानला पाहता येणार आहे.
हे देखील वाचा- ZEE5 तर्फे ‘द सिग्नेचर’ची घोषणा; सामान्य माणसाची असामान्य गोष्ट चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित!
कोणत्या दिवशी भव्य प्रीमियर होईल?
बिग बॉस १८ चा भव्य प्रीमियर 6 ऑक्टोबरला रात्री 9 वाजता होणार आहे. फक्त कलर्सवर आणि जिओ सिनेमा यावर बिग बॉस प्रेमींना हा शो पाहता येणार आहे. या प्रोमो व्हिडिओने चाहत्यांची उत्कंठा दुप्पट केली आहे. इतकंच नाही तर अनेक बातम्यांदरम्यान सलमान खानच्या शोमधील झलकने चाहत्यांना वेडे केले आहे.