(फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
ओटीटी प्लॅटफॉर्मवर सतत नवीन चित्रपट आणि मालिका येत असतात. नेहमीच काहीतरी असे येते जे प्रेक्षकांना आवडते.आजकाल काही लोकांसोबत असे घडत आहे, कारण ओटीटीवरील मालिकेचा प्रत्येक भाग एका नवीन व्यक्तीबद्दल संशय निर्माण करतो. आपण अश्या सीरीज बद्दल बोलत आहोत ज्याचा सस्पेन्स तुम्हाला थक्क करून.
नुकतीच ओटीटी प्लॅटफॉर्म जिओ हॉटस्टारवर प्रदर्शित झालेली ‘सर्च: द नैना मर्डर केस’ ही वेबसीरिज आहे. या सीरिजच्या पहिल्या सिझनमध्ये एकूण ६ एपिसोड्स आहेत. प्रत्येक भाग पाहताना प्रेक्षकांच्या मनात सतत प्रश्न निर्माण होतो. “खरा आरोपी हा आहे का, की तो?” पण खरी गोष्ट काय आहे हे सीरिजच्या शेवटपर्यंतही एक गूढ रहस्यच राहते.
काय आहे स्टोरी?
‘सर्च: द नैना मर्डर केस’ ची स्टोरी नैना नावाच्या एका तरुणीच्या हत्येभोवती फिरते. नैना ही एक कॉलेजची विद्यार्थिनी आहे आणि तिच्या हत्येनंतर, तिच्या जवळचे कोणीही संशयाच्या भोवऱ्यात येते. मनोरंजक म्हणजे, शेवटच्या भागातही नैनाला कोणी मारले हा प्रश्न अनुत्तरीत राहतो. सस्पेन्स आणि थ्रिलरने भरलेली ही मालिका तुम्ही देखील पाहू शकता.
या मालिकेचे एकूण सहा भाग आहेत.
ही मालिका ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होताच खळबळ उडाली आणि पहिल्या क्रमांकावर ट्रेंडिंगमध्ये होती. तिला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे आणि प्रेक्षकांकडून तिला प्रचंड प्रेम मिळाले आहे. १० ऑक्टोबर रोजी ही मालिका ओटीटी प्लॅटफॉर्म जिओ हॉटस्टारवर प्रसारित झाली. या मालिकेत सहा भाग आहेत, प्रत्येक भाग सस्पेन्सने भरलेला आहे.






