फोटो सौजन्य - Social Media
काय म्हणाली शमिका Shetty ?
shamika ने पोस्ट शेअर करत Troller ला प्रतिउत्तर दिले आहे. पंकज मित्तल असे Troller चे नाव असून त्याने Shamika साठी काही कमेंट्स केले आहेत. शमिकाने त्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देत खाली नमूद केले आहे की, “मला तुमच्या या सुंदर कमेंट्सला प्रतिउत्तर देण्याच्या या सुंदर संधीचा लाभ घ्यायचा आहे.” पुढे तिने त्या व्यक्तीकडून आलेल्या एकाएका कमेंट्सचे अगदी मिश्किल भाषेत प्रतिउत्तर दिले आहे.
जेव्हा Troller म्हणतो की, “आता तुझं वय झालंय, तुमच्यात ती गोष्ट आता राहिली नाही” तेव्हा Shamika त्याला उत्तर देत म्हणते की “हो नक्कीच! माझं दिसणं बदलत जाईल आणि हा निसर्गाचा नियम आहे. कोणतीही गोष्ट स्थिर-कायम राहत नाही. पण माझ्या वयात मी निरोगी आहे, स्वास्थ्यात उत्तम आहे आणि आनंदी आहे, जे माझ्यासाठी जास्त महत्वाचं आहे.”
जेव्हा तिला तिच्या लग्नावरून troll केलं जात आणि म्हंटल जात की “वेळेवर लग्न केलं असतंस तर आज तुझी मुलं मोठी असती” तेव्हा Shamika म्हणते “तुम्ही लग्न करून असं काय दिवे लावले?” रागाच्या भरात Shamika त्या व्यक्तीला सुनावते की, “सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, आम्ही सिंगल महिलांना वयावरून टोमणे मारण्यासाठी आणि तुमची पुरुषप्रधान, अगदी गुहेतल्या माणसांसारखी मागासलेली विचारसरणी आमच्यावर लादण्यासाठी तुम्ही आम्हाला फॉलो तरी का करता? कृपया माझ्यावर एक उपकार करा आणि लगेच मला अनफॉलो करा!”






