(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
प्रविण तरडे दिग्दर्शित देऊळ बंद २ आता परीक्षा देवाची हा बहुचर्चित मराठी चित्रपट २१ मे २०२६ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला असून या चित्रपटाला संपूर्ण महाराष्ट्रातून भरभरून प्रेम मिळत आहे. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी चित्रपटाने ३.०५ कोटींची कमाई केली तर पुण्यातील अनेक शो हे हाऊसफुल झाल्याची माहिती आहे. चित्रपटाची क्रेझ सध्या इतकी वाढली आहे की सकाळच्या शोला देखील प्रक्षकांची उत्स्फूर्त गर्दी पाहायला मिळाली. या चित्रपटाने अवघ्या सात दिवसांत बॉक्स ऑफिसवर २८.२७ कोटींचा गल्ला जमावला आहे. सध्या सर्वत्र देऊळ बंद २ चे शोज हाऊसफुल्ल सुरू आहेत. या चित्रपटात अभिनेत्री स्नेहल तरडे आणि मोहन जोशींची प्रमुख भूमिका पाहायला मिळत आहे.
चित्रपटाला मिळणारा भरघोस प्रतिसाद पाहून अभिनेत्री स्नेहल तरडे यांनी एक भावनिक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. जी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही पोस्ट शेअर करताना त्यांनी शूटिंगवेळीचे काही क्षण त्यांनी पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये प्रवणी तरडे आणि त्यांची पत्नी स्नेहल तरडे यांचे सुंदर बॉण्डिंग पाहायला मिळत आहे. ”तू, मी आणि देऊळ बंद २!” असं कॅप्शन त्यांनी या पोस्टला दिले आहे.
स्नेहल तरडे यांची भावनिक पोस्ट
स्नेहल तरडे यांनी लिहिले, ”आज 1 आठवडा झाला चित्रपट प्रदर्शित होऊन. चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद पाहून खूप आनंद होतो आहे. तू आणि मी.. एकाच कलेच्या प्रेमात असणारी दोन माणसं! स्वामींनी आपल्याला एकत्र आणलं त्यात आपलं एकमेकांवर असलेलं प्रेम आणि आपलं आपल्या कलेवर असलेलं प्रेम, या दोन्ही गोष्टींची गुंफण घालून काहीतरी वेगळं साध्य करुन घ्यायचं होतं त्यांना हे आता कळतंय.. आपलं निमित्त करुन अनेक सामाजिक प्रश्न, शेतकर्यांच्या समस्या, देवावर वाढत असलेली अश्रद्धा अशा अनेक गोष्टी अधोरेखित करुन त्यावरचे उपाय समाजाला सांगायचे होते स्वामींना..”
त्याने पुढे लिहिले, चित्रपटातून मिळणारा नफा आत्महत्या केलेल्या शेतकर्यांच्या मुलींच्या थांबलेल्या शिक्षणावर खर्च करण्याची बुद्धी देऊन, त्यांच्या स्त्रियांना आर्थिक विवंचनेतून बाहेर पडण्यासाठी मदत करायची होती स्वामींना.. योग्य वेळ साधून सगळंकाही घडवून आणलं त्यांनी! त्यांच्या या एवढ्या मोठ्या कृपेचे आपण पात्र ठरलो आहोत हे आपले केवढे मोठे भाग्य म्हणायचे!! स्वामी महाराज, तुमची अशीच कृपा जन्मोजन्मी आमच्या भाग्यात येवो हीच तुमच्या चरणी प्रार्थना! श्री स्वामी समर्थ महाराज की जय ” अशी भावनिक पोस्ट करत अभिनेत्री स्नेहल तरडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत..
चित्रपटाची कथा
दरम्यान ‘देऊळ बंद २’ हा चित्रपट श्रद्धेविरुद्ध विज्ञान या संकल्पनेवर बनवण्यात आला आहे. पहिल्या भागातही संकल्पना अशीच होती ज्यात आपल्याला श्रद्धेपुढे विज्ञान हरल्याचे दिसले. पण आता परिक्षा देवाची या पुढच्या भागात नक्की विजय कुणाचा हे पाहणं मनोरंजक ठरेल. कलाकारांनी या चित्रपटात भरपूर मेहनत घेतली आहे आणि याच मेहनतीचे फळ आपल्याला चित्रपटाच्या प्रसिद्धीतून दिसून येते. चित्रपट ११ वर्षांपूर्वी आलेल्या सुपरहिट ‘देऊळ बंद’ या चित्रपटाचा सिक्वेल असणार आहे. पहिल्या भागाप्रमाणेच यात भक्ती, विज्ञान आणि श्रद्धेचा सुंदर संगम पाहायला मिळेल






